One8 Commune : विराटच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायचं असेल तर किती खर्च येईल? 'या' पोस्टवरुन येईल अंदाज

Virat Kohli One8 Commune : हैदराबादमधील स्नेहा नावाच्या एका तरुणीने दावा केला आहे की, विराटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉर्न स्टार्टरची किंमत 525 रुपये आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

टीम इंडिया स्टार खेळाडू विराट कोहली जगातील श्रीमंत खेळाडूंपैकी एक आहे. कोहली जाहिरात, स्पॉन्सर्सशिपच नाहीतर व्यवसायातून मोठी कमाई करतो. विराट कोहली One8 Commune नावाच्या रेस्टॉरंट चेनचा मालकही आहे. विराटच्या याच रेस्टॉरंटसंबंधित एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटचं हॉटेल म्हणजे तिथे जेवण कसं असेल आणि किती महाग असेल असा प्रश्न अनेका पडला असेल. याचाच अंदाज या व्हायरल पोस्टमधून येत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हैदराबादमधील स्नेहा नावाच्या एका तरुणीने दावा केला आहे की, विराटच्या रेस्टॉरंटमध्ये कॉर्न स्टार्टरची किंमत 525 रुपये आहे. सोशल मीडियावर स्नेहाची ही पोस्ट व्हायरल होत आहे. स्नेहाने लिहिलं की,  "मी आज यासाठी वन8 कम्युनमध्ये 525 रुपये दिले." यासोबतच एक रडणारा इमोजीही जोडला आहे.

विराट कोहलीच्या रेस्टॉरंटशी संबंधित ही पोस्ट स्नेहाने 11 जानेवारीला शेअर केली होती. मात्र आता ती व्हायरल होत आहे. या पोस्टला लिहिल्यापर्यंत 12 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते. 11 हजारहून अधिक लोकांना या पोस्टला लाईक केले आहे, तर एक हजारहून अधिक लोकांना पोस्टवर कमेंट केल्या आहेत.

((नक्की वाचा-  Team India : गंभीरच्या जवळचा टीम इंडियाच्या बाहेर, दिग्गज खेळाडूंनाही धक्का! BCCI बदलणार नियम)

या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले, "ऑर्डर का दिली? प्रत्येक गोष्टीची किंमत मेनूमध्ये लिहिलेली असते." दुसऱ्या युजरने लिहिले की, "ऑर्डर देण्यापूर्वीच तुम्हाला हे माहित होते, त्यामुळे रडणे थांबवा." 

Advertisement

( नक्की वाचा : Team India : 6 महिने मिळत नव्हती कुठं संधी, आता 664 ची सरासरी! टीम इंडियात होणार निवड? )

एका युजरने तर पेमेंटचे संपूर्ण ब्रेकअप देत म्हटलं की, कॉर्नसाठी 10 रुपये, प्लेटसाठी 100 रुपये, टेबलसाठी 50 रुपये, खुर्चीसाठी 100 रुपये, एसीसाठी 150 रुपये आणि करासह 65 रुपये घेण्यात आले आहेत.

Topics mentioned in this article