VIDEO : क्रिकेट सोडून पार्ट्या करण्यावरून टीका, पृथ्वी शॉ पुन्हा पार्टीत दिसला

Prithvi Shaw News : पृथ्वीने शेवटचे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याला विजय हजारे ट्रॉफीत संघातून वगळण्यात आले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आयपीएल 2025 साठी अनसोल्ड राहिला आहे. याशिवाय रणजी ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघातूनही त्याला वगळण्यात आलं आहे. त्याच्या खराब फॉर्म, फिटनेस आणि बेशिस्तपणा ही त्याच्या करिअरमध्ये अडथळा ठरत असल्याचं बोललं जात आहे. पृथ्वी शॉच्या पार्ट्यांच्या उपस्थितीवरुन त्याच्यावर टीका केली जात असते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

एकीकडे करिअर धोक्यात असताना आणि सतत टीका होत असताना पृथ्वी शॉ पुन्हा एकदा पार्टीत दिसला आहे. विरल मोटानीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये तो सहभागी झाला होता. डोक्यावर कॅप, काळ्या रंगांचं जॅकेट आणि चेहऱ्यावर मास्क घालून पृथ्वी शॉ कारमधून कार्यक्रमस्थळी पोहोचला. आत प्रवेश करताच चाहत्यांनी त्याला घेरले आणि फोटो, सेल्फीसाठी विनंती करु लागले. 

(नक्की वाचा-  Rishabh Pant: ऋषभ पंतच्या खांद्यावर कुणाचा हात होता? 6 वर्षानंतर उलगडलं 'त्या' फोटोचं रहस्य)
 
गर्दीतील एक व्यक्ती पृथ्वी शॉला "स्ट्राँग कमबॅक होगा" असा बोलत प्रोत्साहन देताना दिसला. पृथ्वीने शेवटचे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 मध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते. त्यानंतर त्याला विजय हजारे ट्रॉफीत संघातून वगळण्यात आले होते. आगामी रणजी ट्रॉफीसाठी पृथ्वी शॉ मुंबईच्या संघात स्थान मिळेल की नाही हे देखील निश्चित नाही.

पृथ्वी शॉचं करिअर

भारतीय क्रिकेटमधील भविष्य असं पृथ्वी शॉकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या काही काळापासून त्याचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. कसोटी कारकिर्दीत, शॉने 5 सामने खेळले असून 42.37 च्या सरासरीने त्याने 339 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. हा एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 189 धावा केल्या आहेत. ज्यात 49 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तर त्याने T20I चा एकचा सामना खेळला आहे.

Advertisement

(नक्की वाचा : Amit Shah सर्वांसमोर Jay Shah वर चिडले ! बाप-लेकामध्ये काय झालं? पाहा Video)
 
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पृथ्वी शॉने 58 सामन्यांमध्ये 46.02 च्या प्रभावी सरासरीने 4,556 धावा केल्या आहेत. ज्यात 13 शतके आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने 65 सामन्यात 10 शतके आणि 14 अर्धशतकांसह 3399 धावा केल्या आहेत. 

Topics mentioned in this article