जाहिरात

Rishabh Pant: ऋषभ पंतच्या खांद्यावर कुणाचा हात होता? 6 वर्षानंतर उलगडलं 'त्या' फोटोचं रहस्य

Rishabh Pant News : भारतीय फॅन्सना गेल्या सहा वर्षांपासून पडलेल्या एका प्रश्नाचं उत्तर ऋषभ पंतनं अखेर दिलं आहे. 

Rishabh Pant: ऋषभ पंतच्या खांद्यावर कुणाचा हात होता? 6 वर्षानंतर उलगडलं 'त्या' फोटोचं रहस्य
मुंबई:

Rishabh Pant News : भारतीय क्रिकेटपटू काय करतात? कुणाला भेटतात? याकडं त्यांच्या फॅन्सचं सतत लक्ष असतं. त्यावर फॅन्समध्ये चर्चा होत असते. 2019 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कपच्या दरम्यान टीम इंडियाच्या काही खेळाडूंचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो फोटो पाहून अनेक क्रिकेट फॅन्सना एक प्रश्न पडला होता. भारतीय फॅन्सना गेल्या सहा वर्षांपासून पडलेल्या एका प्रश्नाचं उत्तर ऋषभ पंतनं अखेर दिलं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय होता फोटो?

व्हायरल फोटोमध्ये ऋषभ पंतसोबत महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि मयंक अग्रवाल आहे. 2019 वन-डे वर्ल्ड कपच्या दरम्यान हा फोटो काढण्यात आला होता. तेव्हापासूनच हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. या फोटोमध्ये ऋषभ पंतच्या डाव्या खांद्यावर एक हात दिसतोय. पण, त्याच्या मागे कुणीच नाही. 

ऋषभ पंतनं नुकताच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर #AskRP हा हॅशटॅग वापरुन फॅन्सना प्रश्न विचारण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी एका युझरनं हा फोटो शेअर करत तुझ्या खांद्यावर कुणाचा हात होता? असा प्रश्न विचारला. 

ऋषभ पंतनं त्याचं उत्तर दिलं आहे. माझ्या खांद्यावरचा हात मयंक भाईचा  होता, असं ऋषभनं सांगितलंय. त्यानं या ट्वि्टमध्ये मयंकला टॅग देखील केलं आहे. त्यामुळे सहा वर्ष जुनं कोडं अखेर सुटलं आहे. 

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये झालेल्या 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं आव्हान सेमी फायनलमध्ये संपुष्टात आलं होतं. त्या स्पर्धेत रोहित शर्मानं सर्वाधिक 648 रन्स केले होते. पण, टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात तो अपयशी ठरला. वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये यजमान न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पराभव केला. महेंद्रसिंह धोनीचा तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. 

Amit Shah सर्वांसमोर Jay Shah वर चिडले ! बाप-लेकामध्ये काय झालं? पाहा Video=

( नक्की वाचा : Amit Shah सर्वांसमोर Jay Shah वर चिडले ! बाप-लेकामध्ये काय झालं? पाहा Video )

पंतनं केली निराशा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये (Border-Gavaskar Trophy 2024-25) ऋषभ पंतची कामगिरी निराशाजनक झाली होती. यापूर्वीचा ऑस्ट्रेलिया दौरा गाजवणाऱ्या पंतला या सीरिजमध्ये 28.33 च्या सरासरीनं 255 रन करता आले. 9 इनिंगमध्ये त्याला फक्त 1 हाफ सेंच्युरी झळकावता आली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com