दमदार सेंच्युरीसह प्रकट झाला इशान किशन! निवड समितीची वाढवली डोकेदुखी

Ishan kishan makes comeback with solid hundred: इशान किशननं नुसतचं कमबॅक केलं नाही, तर दमदार सेंच्युरी झळकावली

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Ishan kishan makes comeback with solid hundred: टीम इंडिया विकेट किपर इशान किशन (Ishan Kisan) पूर्णपणे फिट नसल्यानं भारतीय टीमच्या बाहेर आहे. तो दुलिप ट्रॉफी स्पर्धेच्या (Duleep Trophy 2024) पहिल्या फेरीतही खेळला नव्हता. त्याची दुसऱ्या राऊंडसाठीही निवड झाली नव्हती, पण, गुरुवारी (12 सप्टेंबर) अनंतपूरमध्ये सुरु असलेल्या भारत 'बी' विरुद्ध भारत 'सी' मॅचमध्ये अचानक इशान किशन प्रकट झाल्यानं फॅन्सना धक्का बसला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इशान किशननं नुसतचं कमबॅक केलं नाही, तर दमदार सेंच्युरी झळकावली. त्यानं देशातील महत्त्वाच्या स्पर्धेत फक्त 103 बॉलमध्ये सेंच्युरी पूर्ण केली. त्याच्या या सेंच्युरीमुळे अजित आगरकर यांच्या निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे. 

वन-डे स्टाईल बॅटिंग

देशांतर्गत क्रिकेटमध्ये मोठ्या कालावधीनंतर कमबॅक करणाऱ्या इशान किशन स्वत:ला सिद्ध करण्यासाठीच मैदानात उतरला होता. त्यानं वन-डे स्टाईल बॅटिंग केली. मुकेश कुमार, नवदीप सैनी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश असलेल्या भारत 'ब' च्या बॉलिंग अटॅकसमोर त्यानं 126 बॉलमध्ये 14 फोर आणि 3 सिक्ससह 111 रन काढले. या इनिंगमध्ये त्याचा स्ट्राईक रेट 88.10 इतका होता. इशान किशनच्या फॅन्सना त्याचं हे शतक नक्कीच दिलासा देणारं आहे. 

निवड समितीसमोर प्रश्न

इशान किशनच्या या इनिंगनं राष्ट्रीय निवड समितीसमोर मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. बांगलादेश विरुद्ध होणाऱ्या पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. या टीममध्ये ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल हे दोन विकेट किपर आहेत. आता या खेळीनंतर निवड समिती दुसऱ्या टेस्टसाठी इशान किशनचा विचार करणार का हा प्रश्न आहे.

Advertisement

इशान किशनला टीम इंडियात जागा मिळवायची असेल तर त्यांनं देशांतर्गत क्रिकेट खेळावं आणि त्यामध्ये चांगली कामगिरी करावी, असा सल्ला टीम इंडियाचे माजी कोच राहुल द्रविड यांनी दिला होता. इशाननं या सेंच्युरीसह द्रविडची अट पूर्ण केलीय. आता बॉल निवड समितीच्या कोर्टात आहे. 

 ( नक्की वाचा : Himanshu Singh : 21 वर्षांच्या मुंबईकरची का होतीय चर्चा? त्याचं अश्विनशी काय आहे साम्य? )

इशान किशन टीम इंडियाकडून गेल्या वर्षी शेवटचं खेळला होता. त्यानं मानसिक थकव्याचं कारण देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून परत येण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या या निर्णयाचे जोरदार पडसाद उमटले. देशांतर्गत क्रिकेटसाठी स्वत:ला अनफिट जाहीर करणारा इशान हार्दिक पांड्यासोबत आयपीएलसाठी जीममध्ये घाम गाळत होता. त्याच्या या कृतीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. बीसीसीआय सचिवांच्या सूचनेनंतरही तो फर्स्ट क्लास क्रिकेट खेळला नाही. त्यामुळे त्यांना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टही गमवावं लागलं. 
 

Advertisement
Topics mentioned in this article