Shikhar Dhawan: शिखर धवनला ईडीचं समन्स; चौकशीसाठी हजर राहावं लागणार, काय आहे प्रकरण?

1XBET नावाच्या एका अवैध सट्टेबाजी ॲपच्या तपासाच्या संदर्भात, पीएमएलए (PMLA) कायद्याअंतर्गत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. रैना काही जाहिरातींच्या माध्यमातून या ॲपशी जोडले गेले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • शिखर धवन को अवैध सट्टेबाजी ऐप से जुड़े मामले में ईडी ने पूछताछ के लिए तलब किया है
  • इससे पहले पूर्व भारतीय क्रिकेटर सुरेश रैना से भी 8 घंटे की लंबी पूछताछ हो चुकी है
  • एजेंसियों की तरफ से गूगल और मेटा के प्रतिनिधियों को पूछताछ के लिए बुलाया था
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनला ईडीने समन्स पाठवलं आहे. एका अवैध सट्टेबाजी ॲपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी आज अंमलबजावणी संचालनालय धवन यांची चौकशी करणार आहे. ईडीने शिखर धवनला सकाळी चौकशीसाठी बोलावले आहे.

अवैध ऑनलाइन सट्टेबाजी प्लॅटफॉर्मशी संबंधित हे प्रकरण आहे. या ॲपच्या जाहिरातींमध्ये धवनच्या फोटोंचा वापर केल्याबद्दल वाद निर्माण झाला होता. ईडी अधिकारी सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत की, धवन यांच्या परवानगीने या जाहिराती झाल्या होत्या का? तसेच, यातून झालेले आर्थिक व्यवहार मनी लॉन्ड्रिंगच्या कक्षेत येतात का? याचीही तपासणी ईडी करत आहे.

( नक्की वाचा : MS Dhoni : 'कॅप्टन कूल' धोनीनं भर मैदानात मला शिव्या दिल्या...,' CSK च्या माजी खेळाडूनं सांगितली Untold Story )

सुरेश रैनांचीही 8 तास चौकशी

यापूर्वी, माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना यांचीही एका कथित अवैध सट्टेबाजी ॲपशी संबंधित प्रकरणात आठ तासांहून अधिक काळ चौकशी झाली आहे. 1XBET नावाच्या एका अवैध सट्टेबाजी ॲपच्या तपासाच्या संदर्भात, पीएमएलए (PMLA) कायद्याअंतर्गत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. रैना काही जाहिरातींच्या माध्यमातून या ॲपशी जोडले गेले होते. ईडी या प्रकरणात त्यांच्या संबंधांची, जाहिरातींमधून मिळालेल्या उत्पन्नाची आणि दोन्ही पक्षांमधील संवादाची चौकशी करत आहे.

Advertisement

याच तपासाअंतर्गत ईडीने अलीकडेच गुगल (Google) आणि मेटा (Meta) च्या प्रतिनिधींनाही चौकशीसाठी बोलावले होते. ‘परिमैच' नावाच्या आणखी एका ऑनलाइन सट्टेबाजी ॲपच्या विरोधातही अशाच प्रकारची चौकशी सुरू आहे.

( नक्की वाचा : Irfan Pathan : 'मी हुक्का लावणारा नाही...': इरफान पठाणचा MS Dhoni वर गंभीर आरोप; जुने वक्तव्य Viral )

Advertisement

भारतामध्ये ऑनलाइन सट्टेबाजीचा बाजार

अनेक अवैध सट्टेबाजी ॲप्सने लोकांना आणि गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बाजार विश्लेषण कंपन्यांच्या अंदाजानुसार, भारतात अशा विविध ऑनलाइन सट्टेबाजी ॲप्सचे सुमारे 22 कोटी युजर्स आहेत, त्यापैकी सुमारे 11 कोटी नियमित युजर्स आहेत. तज्ज्ञांच्या मते, भारतातील ऑनलाइन सट्टेबाजी ॲपचा बाजार 100 अब्ज अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त आहे.