Rohit Sharma VIDEO : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा नेहमीच मुंबईच्या रस्त्यावर त्यांची लक्झरी Lamborghini Urus SE चालवताना दिसतो. मात्र, आता रोहित शर्मा यांच्या गॅरेजमध्ये आणखी एका हाय-टेक कारची एंट्री झाली आहे. अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माने नुकतीच Tesla Model Y ही इलेक्ट्रिक कार खरेदी केली आहे. या नव्या कारमधून रोहित शर्मा ड्रायव्हिंग करत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यावर टेस्लाचे सह-संस्थापक एलॉन मस्क यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे.
एका युजरने रोहित शर्मा टेस्ला Model Y चालवत असल्याचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, "Tesla ला जाहिरात करण्याची गरज का नाही? याचे हे कारण भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार ज्याचे इंस्टाग्रामवर 45 मिलियन फॉलोअर्स आहेत, त्याने नुकतीच नवी Tesla Model Y खरेदी केली आहे." ही पोस्ट टेस्लाचे सह-संस्थापक आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क यांच्या नजरेत आली आणि त्यांनी ती पोस्ट री-शेअर केली.
रोहित शर्माचा हा व्हिडिओ टेस्लासाठी एकप्रकारे जबरदस्त 'ऑरगॅनिक' जाहिरात ठरला आहे. कारण त्याच्या स्टार पॉवरमुळे आणि प्रचंड फॅन फॉलोईंगमुळे ही बातमी जगभरात पोहोचली आहे.
टेस्लाने आणले स्वस्त 'स्टँडर्ड' मॉडेल
रोहित शर्माने टेस्ला Model Y खरेदी करण्याची बातमी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा टेस्ला कंपनीने Model Y आणि Model 3 चे नवीन 'परवडणारे' व्हर्जन बाजारात आणले आहेत. या नवीन व्हर्जनला Model Y Standard आणि Model 3 Standard असे नाव देण्यात आले आहे. बाजारात वाढलेली स्पर्धा आणि विक्रीत झालेली थोडीशी घट यामुळे कंपनीने विक्रीला पुन्हा गती देण्यासाठी आणि अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हे एंट्री-लेव्हल मॉडेल सादर केले आहेत. या नवीन व्हर्जनमुळे आता कंपनीने 'लॉन्ग रेंज' व्हर्जनला 'प्रीमियम' श्रेणीत समाविष्ट केले आहे. मात्र, सध्या हे नवीन आणि स्वस्त 'स्टँडर्ड' व्हर्जन फक्त अमेरिकेच्या बाजारपेठेत उपलब्ध आहेत.