IPL 2025 : इंग्लंडच्या क्रिकेटरला मिळाली नियम मोडण्याची शिक्षा, BCCI नं घातली 2 वर्षांची बंदी

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:


IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या सिझनला 22 मार्चपासून सुरुवात होत आहे. हा सिझन सुरु होण्यापूर्वी इंग्लंडचा प्रमुख बॅटर हॅरी ब्रुकनं (Harry Brook) या सिझनमधून माघार घेतली आहे. या माघारीबद्दल बीसीसीआयनं त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. हॅरी ब्रुक आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

बीसीसीआयनं जाहीर केलेल्या नियमानुसार कोणत्याही विदेशी खेळाडूनं आयपीएल ऑक्शनसाठी नोंदणी केली असेल आणि त्यानं लिलावात खरेदी केल्यानंतर सिझनच्या पूर्वी स्पर्धेतून स्वत:हून माघार घेतली  तर त्याला दोन सिझनसाठी आयपीएल आणि आयपीएल ऑक्शनमधून बंदी घालण्यात येईल.

हॅरी ब्रुकला या आयपीएल सिझनसाठी दिल्ली कॅपिटल्सनं खरेदी केलं होतं. आता त्यांना ब्रुकच्या जागी नवा खेळाडू शोधावा लागेल. अर्थात आयपीएल सिझनमधून माघार घेण्याची ब्रुकची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यानं मागील आयपीएल सिझनमधून कौटुंबीक कारणामुळे माघार घेतली होती. 

यंदा का घेतली माघार?

हॅरी ब्रुकनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आयपीएल सिझनमधून माघार घेण्याची घोषणा केली होती. 'मी आयपीएलच्या आगामी सिझनमधून माघार घेण्याचा अत्यंत अवघड निर्णय घेत आहे. त्यासाठी मी दिल्ली कॅपिटल्स आणि त्यांच्या फॅन्सची बिनशर्त माफी मागतो. इंग्लंड क्रिकेटसाठी हा महत्त्वाचा कालखंड आहे. मला आगामी सिझनसाठी पूर्णपणे फिट व्हायचं आहे.'

Advertisement

( नक्की वाचा : IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ठरला! टीम इंडियाच्या ऑल राऊंडरवर मोठी जबाबदारी )
 

ब्रुकनं पुढं लिहिलं की, 'मला माझ्या आजवरच्या करिअरमधील सर्वात व्यस्त कालखंडात स्वत:ला फ्रेश ठेवण्यााठी वेळ हवा आहे. मला माहितीय की, हे कुणीही समजणार नाही. मी त्याची अपेक्षा देखील करत नाही. पण, माझ्यासाठी जे योग्य. आहे ते मला करावं लागेल. माझ्या देशाकडून खेळणं ही माझी प्राथमिता आहे. माझं संपूर्ण लक्ष याच गोष्टीवर आहे.'

Topics mentioned in this article