जाहिरात

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ठरला! टीम इंडियाच्या ऑल राऊंडरवर मोठी जबाबदारी

IPL 2025 : क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची T20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा 18  वा सिझन 22 मार्चपासून सुरु होत आहे. या सिझनसाठी दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ठरला आहे.

IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ठरला! टीम इंडियाच्या ऑल राऊंडरवर मोठी जबाबदारी
मुंबई:

IPL 2025 : क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची T20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा 18  वा सिझन 22 मार्चपासून सुरु होत आहे. या सिझनसाठी दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन ठरला आहे. दिल्लीनं टीम इंडियाचा ऑल राऊंडर अक्षर पटेलची (Axar Patel) कॅप्टन म्हणून नियुक्ती केलीय. टीम इंडियानं जिंकलेल्या T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी टीमटचा अक्षर महत्त्वाचा सदस्य होता. त्याला दिल्ली कॅपिटल्सनं या सिझनपूर्वी 16 कोटी 50 लाख रुपयांना रिटेन केले होतं. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

अक्षर पटेल यंदा पहिल्यांदाच आयपीएल टीमचा पूर्णवेळ कॅप्टन बनलाय. यापूर्वी मागच्या वर्षी ऋषभ पंतच्या अनुपस्थितीमध्ये अक्षरनं एक मॅच दिल्लीची कॅप्टनसी केली होती. यावर्षी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत त्यानं गुजरातच्या टीमचं नेतृत्त्व केलं होतं. 

ऋषभ पंतनं दिल्ली कॅपिटल्स सोडल्यानंतर अक्षर दिल्लीच्या टीममधील सर्वात अनुभवी खेळाडू बनला. तो दिल्लीकडून 6 सिझनमध्ये 82 सामने खेळला आहे. अक्षरनं मागील आयपीएल सिझनमध्ये जवळपास 30 च्या सरासरीनं 235 रन्स केले आहेत. तर 7.65 च्या इकोनॉमी रेटनं 11 विकेट्स घेतल्या होत्या. 

...तर Jasprit Bumrah चं करिअर समाप्त होईल! दिग्गज बॉलरचा टीम इंडियाला इशारा

( नक्की वाचा : ...तर Jasprit Bumrah चं करिअर समाप्त होईल! दिग्गज बॉलरचा टीम इंडियाला इशारा )

'दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधारपद भूषवणं हा माझ्यासाठी बहुमान आहे. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल टीमचे मालक आणि सपोर्ट स्टाफचे आभार,' अशी भावना अक्षरनं व्यक्त केलीय. माझा दिल्ली कॅपिटल्समध्ये क्रिकेटर आणि माणूस म्हणून विकास झालाय. या टीमचं नेतृत्त्व करण्यासाठी मी सज्ज आहे,' असं अक्षरनं सांगितलं. 

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमममध्ये केएल राहुल आणि फाफ ड्यू प्लेसिस हे माजी आयपीएल कॅप्टन आणि मिचेल स्टार्क हा वर्ल्ड कप विजेचा फास्ट बॉलर आहे. आयपीएलचं हे अठरावं सिझन आहे. या अठरा सिझनमध्ये अक्षर हा दिल्लीचा 14 वा कॅप्टन आहे.

यापूर्वी वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक, शाही होप्स, महेला जयवर्धने, रॉस टेलर, डेव्हिड वॉर्नर, केव्हिन पीटरसन, जेपी ड्यूमिनी, झहीर खान, करुण नायर, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत हे दिल्लीचे कॅप्टनस होते. 

Comments

पहिल्या सिझनपासून आयपीएल खेळूनही दिल्लीला आजवर एकदाही आयपीएल विजेतेपद पटकावता आलेलं नाही. तसंच टीमनं फक्त एकदाच फायनलमध्ये प्रवेश केला आहे. हे अपयश पुसण्याचं खडतर आव्हान अक्षरपुढं आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: