
ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन आणि भारताचा सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वातील दोन 'ऑल टाईम ग्रेट' खेळाडू मानले जातात. कोणत्याही बॅटरनं केलेल्या सर्वोच्च कामगिरीची तुलना त्यांच्या रेकॉर्डशी केली जाते. श्रीलंकाविरुद्धच्या सीरिजमधील इंग्लंडचा कॅप्टन ऑली पोपनं (Ollie Pope) या दोघांनाही कधी जमलं नाही, अशी कामगिरी केली आहे. इंग्लंडचा नियमित कॅप्टन बेन स्टोक्स सध्या जखमी आहे. त्याच्या गैरहजेरीत पोप या सीरिजमध्ये कॅप्टनसी करतोय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पोपच्या कॅप्टनसीमध्ये इंग्लंडनं दोन टेस्ट सहज जिंकल्या. पण, बॅटर म्हणून त्याची कामगिरी साधारण होती. पोपला पहिल्या चार इनिंगमध्ये फक्त 30 रन काढता आले होते. पण, शुक्रवारपासून (6 सप्टेंबर) ओव्हलवर सुरु झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये पोपनं खराब फॉर्मची भरपाई केली आहे. श्रीलंका विरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी पोपनं नाबाद 103 रन काढले. त्याच्या सेंच्युरीच्या जोरावर इंग्लंडनं पहिल्या दिवसाच्या अखेरीस 3 आऊट 221 असा भक्कम स्कोअर उभा केला.
( नक्की वाचा : रिझवानची डबल सेंच्युरी रोखण्यासाठी कॅप्टननं केला कट? पाकिस्तानच्या खेळाडूचा मोठा दावा... )
सचिन ब्रॅडमनलाही जमलं नाही
पोपनं ओव्हलवरील पहिली आणि त्याच्या टेस्ट कारकिर्दीमधील सातवी सेंच्युरी झळकावली. विशेष म्हणजे पोपच्या पहिल्या सातही सेंच्युरी टेस्ट क्रिकेट खेळणाऱ्या सात वेगवेगळ्या देशांविरुद्ध आल्या आहेत. डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकरसह 147 वर्षांच्या टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात कुणालाही जमला नाही, असा विक्रम पोपनं केला आहे. पोप पहिल्या दिवसाच्या अखेरीस 103 बॉलमध्ये 103 रन काढून नाबाद होता. या खेळीत त्यानं 13 फोर आणि 2 सिक्स लगावले.
Ollie Pope - The first batter in history to score his first seven Test hundreds against different opposition.
— England Cricket (@englandcricket) September 6, 2024
Take a bow, Ollie 🤝 pic.twitter.com/37hYVSfiN2
लॉर्डस टेस्टमध्ये सेंच्युरी आणि पाच विकेट्स अशी दुहेरी कामगिरी करणाऱ्या बेन डकेतनं (Ben Duckeet) या टेस्टमध्ये फॉर्म कायम ठेवत 86 रन काढले. तर या सीरिजमध्ये फॉर्मात असलेला इंग्लंडचा माजी कॅप्टन जो रुट (Joe Root) फक्त 13 रन काढून आऊट झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world