जाहिरात

IND vs SL : नव्या जबाबदारीत 'सूर्या' तळपला, टीम इंडियाच्या कॅप्टनचा लंकेला तडाखा, Video

India vs Sri Lanka T20 Series : टीम इंडियाच्या T20 टीमची कॅप्टनसी सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) सोपवली आहे. सूर्यानं कॅप्टन म्हणून पहिल्याच मॅचमध्ये दमदार बॅटिंग केली.

IND vs SL : नव्या जबाबदारीत 'सूर्या' तळपला, टीम इंडियाच्या कॅप्टनचा लंकेला तडाखा, Video
Suryakumar Yadav (Photo - AFP)
मुंबई:

India vs Sri Lanka T20 Series :  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील T20 सीरिजला शनिवारी (27 जुलै) सुरुवात झाली आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) टीम इंडियाचा हेड कोच झाल्यानंतरची ही पहिलीच सीरिज आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या T20 टीमची कॅप्टनसी सूर्यकुमार यादववर (Suryakumar Yadav) सोपवली आहे. T20 वर्ल्ड कप विजेतेपदानंतर रोहित शर्मानं (Rohit Sharma) निवृत्ती घेतलीय. त्यानंतर कॅप्टन म्हणून सूर्याला जबाबदारी मिळाली आहे. सूर्यानं कॅप्टन म्हणून पहिल्याच मॅचमध्ये दमदार बॅटिंग केली.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

22 बॉलमध्ये हाफ सेंच्युरी

पल्लकलेमधील या मॅचमध्ये श्रीलंकेचा कॅप्टन चरिथ असलांकानं टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग घेतली. टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगला उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांनी 4 ओव्हर्समध्ये 50 रनची पार्टनरशिप केली. T20 वर्ल्ड कपमध्ये रोहित-विराट ही अनुभवी जोडी भारतीय इनिंग ओपन करत होती. हे दोन्ही खेळाडू आता T20 प्रकारातून रिटायर झाले आहेत. आपण त्यांची जागा घेण्यास सक्षम असल्याचं यशस्वी-गिल जोडीनं दाखवून दिलं.

( नक्की वाचा : BCCI नं वाढवली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी, पुढच्या सिझनमध्ये काय होणार? )

यशस्वीनं 21 बॉलमध्ये 40 तर गिलनं 16 बॉलमध्ये 34 रन केले. पण, फक्त 3 बॉलमध्ये हे दोघंही आऊट झाल्यानं टीम इंडियाची इनिंग अडचणीत सापडली होती. त्यावेळी कॅप्टन सूर्यानं खेळाची सूत्रं हाती घेत रनरेट कमी होऊ दिला नाही.

सूर्यकुमार यादवनं फक्त 22 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं हाफ सेंच्युरी पूर्ण केली. सूर्या आणि पंतनं 43 बॉलमध्ये 76 रनची पार्टनरशिप केली. कॅप्टन सूर्याचा यामधील वाटा 58 रनचा होता. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणारा श्रीलंकन फास्ट बॉलर पथिरानानं त्याला आऊट केलं. 

सूर्यकुमार यादवच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर टीम इंडियानं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 आऊट 213 रन केले. श्रीलंकेकडून पथिराना सर्वात यशस्वी बॉलर ठरला. त्यानं 4 विकेट्स घेतल्या. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Paris Olympics 2024 : नेमबाजीत भारताची दमदार सुरुवात, 20 वर्षांनी केली विक्रमाची बरोबरी
IND vs SL : नव्या जबाबदारीत 'सूर्या' तळपला, टीम इंडियाच्या कॅप्टनचा लंकेला तडाखा, Video
leftists-hijacked-paris-olympics-2024-kangana-ranaut-lashes-out-at-opening-ceremony
Next Article
Paris Olympics 2024 :पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन कार्यक्रमावर कंगना रनौत का संतापली?