जाहिरात

Neymar Retires: फुटबॉल जगतातून मोठी बातमी! ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून संन्यास

Neymar Retires: ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू नेमार याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून संन्यास घेण्याची घोषणा केली आहे. वर्ल्ड कपच्या 'राउंड ऑफ 16' सामन्यात नॉर्वेविरुद्ध मिळालेल्या पराभवानंतर ३४ वर्षीय नेमारने हा मोठा निर्णय घेतला.

Neymar Retires: फुटबॉल जगतातून मोठी बातमी! ब्राझीलचा स्टार खेळाडू नेमारचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून संन्यास

फुटबॉल विश्वातील एक सुवर्ण पर्व आता संपुष्टात आले आहे. ब्राझीलचा स्टार फॉरवर्ड आणि जगातील आघाडीचा फुटबॉलपटू नेमार जूनियर याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून अचानक संन्यासाची घोषणा केली आहे. चालू वर्ल्ड कप स्पर्धेत 'राउंड ऑफ 16' च्या सामन्यात नॉर्वेविरुद्ध ब्राझीलला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या लाजीरवाण्या पराभवानंतर 34 वर्षीय नेमारने आंतरराष्ट्रीय स्तरावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. या ऐतिहासिक कारकिर्दीचा शेवट करताना नेमार ब्राझीलच्या मेन्स नॅशनल टीमच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत 129 सामन्यांमध्ये एकूण 80 गोल केले आहेत.

मैदानावरच अश्रू अनावर

नॉर्वेविरुद्धच्या सामन्याची अंतिम शिट्टी वाजली आणि ब्राझीलचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आले. त्यावेळी नेमारला अश्रू अनावर झाले. मैदानावरच नेमार ढसाढसा रडू लागला. या दिग्गजाच्या रडतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जगभरातील कोट्यवधी चाहत्यांचे हृदय हेलावले. ब्राझीलच्या अनेक सहकाऱ्यांनी त्याला सावरण्याचा प्रयत्न केला. 

मेटलाईफ स्टेडियमवर कारकिर्दीचा 'फुल सर्कल' प्रवास

नेमारच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा प्रवास ज्या मैदानावरून सुरू झाला, त्याच मैदानावर त्याचा शेवट झाला. 2010 मध्ये नेमारने मेटलाईफ स्टेडियम वरूनच सीनियर संघात पदार्पण केले होते आणि पहिला गोलही याच मैदानावर केला होता. योगायोगाने, त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना आणि शेवटचा गोलही याच ऐतिहासिक मैदानावर नोंदवला. आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केला असला, तरी नेमार क्लब फुटबॉल खेळत राहणार आहे. तो सँटोस FC कडून आपला क्लब प्रवास सुरू ठेवणार आहे.

पेलेचा विक्रम मोडला

नेमारने आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्यापेक्षा 3 गोल अधिक केले आहेत. रविवारी नॉर्वेविरुद्धच्या सामन्यात स्टॉपेज टाईममध्ये गोल करून त्याने पेले यांच्या आणखी एका विक्रमाची बरोबरी केली. चार वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये गोल करणारा तो पेले यांच्यानंतरचा केवळ दुसरा ब्राझीलियन खेळाडू ठरला आहे. याशिवाय, ब्राझीलसाठी सर्वाधिक 130 सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो कैफू (142 सामने) यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दुखापतींमुळे शेवटचा वर्ल्ड कप ठरला निराशाजनक

उजव्या पायाच्या दुखापतीमुळे नेमारला या वर्ल्ड कपमधील ब्राझीलच्या 5 पैकी केवळ 2 सामन्यांत त्याला खेळता आले. स्कॉटलंडविरुद्ध तो केवळ 15 मिनिटे मैदानात होता, तर नॉर्वेविरुद्ध 67 व्या मिनिटाला तो बेंचवरून मैदानात आला होता.

युरोपियन संघांविरुद्ध ब्राझीलचा खराब रेकॉर्ड कायम

नॉर्वेकडून मिळालेला हा पराभव वर्ल्ड कपमधील युरोपियन संघांविरुद्ध ब्राझीलचा खराब फॉर्म दर्शवतो. 5 वेळच्या चॅम्पियन ब्राझील संघाला 2002 च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये जर्मनीला हरवल्यानंतर एकाही युरोपियन संघाला पराभूत करता आलेले नाही.

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com