फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आता खऱ्या अर्थाने रंग भरला जात आहे. खऱ्या अर्थाने चुरशीच्या लढती आता 'राउंड ऑफ 16' मध्ये पाहायला मिळणार आहेत. जगातले 16 तगडे संघ आता भिडणार आहेत. हा राऊड नॉक आऊट आहे. त्यामुळे करा किंवा मरा अशी स्थिती सर्वांसाठी असणार आहे. त्यामुळे प्रत्येक संघ वाट्टेल ती किंमत मोजून सामना जिंकण्यासाठी जिव ओतण्यास तयार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून इंग्लंड विरुद्ध मेक्सिको हा सामना कमालीचा चर्चेत आला आहे. 6 जुलै रोजी मेक्सिको सिटीमधील प्रसिद्ध 'एस्टाडियो एज्टेका' स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यापूर्वी इंग्लंडच्या गोटातून एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारी बातमी समोर आली आहे. मेक्सिकोच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी इंग्लंडचे खेळाडू 'व्हायग्रा' (Viagra) ही गोळी घेवून मैदानात उतरतील.
विशेष म्हणजे इंग्लंडच्या वैद्यकीय पथकाने खेळाडूंना या औषधाच्या वापरासाठी हिरवा कंदील दिला आहे. इंग्लंडचे खेळाडू असं का करत आहेत या मागे काय कारण आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मेक्सिको सिटी हे शहर समुद्रसपाटीपासून तब्बल 7,350 फूट (2,240 मीटर) उंचीवर आहे. इतक्या मोठ्या उंचीवर हवेचा दाब कमी राहतो. त्यामुळे आपोआप ऑक्सिजनची पातळी खालावलेली असते. त्यामुळे मैदानावर धावताना खेळाडूंचा स्टॅमिना कमी होती. त्यांना थकवा जाणवू शकतो. ऐवढे काय तर त्यांना रिकव्हरीसाठी ही वेळ लागतो. या समस्या इंग्लंडच्या खेळाडूंना येवू शकतात. याला वैद्यकीय भाषेत 'एल्टीट्यूड सिकनेस' म्हटले जाते.
इंग्लंड आणि मेक्सिकोचं वातावरण परस्पर भिन्न आहे. मेस्किकोच्या अशा वातावरणात खेळण्याचा इंग्लंडच्या खेळाडूना अनुभव नाही. किंवा त्यांना अशा स्थितीत सराव ही केलेला नाही. यावर उपाय म्हणून इंग्लंडच्या मेडिकल स्टाफने वायग्राचा पर्याय निवडला आहे. हे औषध रक्तवाहिन्या खुल्या करते. ज्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि कमी ऑक्सिजनमध्येही फुफ्फुसांची कार्यक्षमता टिकून राहण्यास मदत होते. जागतिक अमली पदार्थ विरोधी संस्था म्हणजेच 'वाडा' (WADA) च्या प्रतिबंधित औषधांच्या यादीत वायग्राचा समावेश नाही. त्यामुळे खेळाडू स्पर्धा सुरू असताना किंवा इतर वेळीही याचे सेवन करू शकतात.
'वाडा'ने केलेल्या संशोधनानुसार, समुद्रसपाटीवर या औषधामुळे खेळाडूंच्या कामगिरीत कोणताही अतिरिक्त फायदा होत नाही. मात्र अधिक उंचीवर हे औषध शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करू शकते. त्यामुळे या गोळ्या खाण्यास वाडाची कोणती ही हरकत नाही. त्यांनी ही यासाठी हिरवा कंदील दिला आहे. मेक्सिकोने चालू विश्वचषकात आतापर्यंतचे सर्व 4 सामने जिंकले आहे. मेक्सिकोचा संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यातच 'एस्टाडियो एज्टेका' या त्यांच्या घरच्या मैदानावर मेक्सिकोला हरवणे अत्यंत कठीण मानले जात आहे. या मैदानावर खेळलेल्या 89 सामन्यांपैकी मेक्सिकोने केवळ 2 सामने गमावले आहेत. त्यामुळे इंग्लंडला या सामन्यात विजय मिळवण्यासाठी सर्वोत्तम खेळासोबतच या विशेष रणनीतीचाही आधार घ्यावा लागणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world