FIFA World Cup 2026: फायनलसाठी वापरल्या जाणाऱ्या फुटबॉलची किंमत किती? काय आहे पाकिस्तान कनेक्शन?

पूर्वी हाताने शिवले जाणारे हे बॉल आता अत्याधुनिक 'थर्मल बॉन्डिंग' तंत्रज्ञानाने मशीनद्वारे बनवले जातात.

जाहिरात
Read Time: 2 mins
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • फीफा वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना रविवारी स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणार आहे
  • अंतिम सामन्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अधिकृत फुटबॉल ‘TRIONDA FINAL’ मध्ये सेन्सर तंत्रज्ञान वापरले गेले आहे
  • ‘TRIONDA Pro’ बॉलची किंमत १४,९९९ रुपये असून त्याला गोल्ड, ब्लॅक, व्हाईट रंगांचा लूक आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

फीफा वर्ल्ड कप 2026 चा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. रविवारच्या महामुकाबल्यात स्पेन आणि अर्जेंटिना आमनेसामने येणार आहेत. वर्ल्डकप जिंकण्यासाठी दोन्ही संघ आपली ताकद झोकणार यात शंका नाही. त्या मुळे हा ऐतिहासिक सामना त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी असणार आहे. पण या फायनलसाठी वापरला जाणारा अधिकृत फुटबॉल ‘TRIONDA FINAL' सध्या जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. अ‍ॅडिडास (Adidas) कंपनीने तयार केलेल्या या खास बॉलची रचना आणि तंत्रज्ञान जितके आधुनिक आहे, तितकीच त्याची किंमतही थक्क करणारी आहे.

अ‍ॅडिडासच्या अधिकृत वेबसाईटनुसार, या ‘TRIONDA Pro' बॉलची किंमत 14,999 रुपये आहे. या बॉलमध्ये मैदानावर खेळाडूंना अचूकता मिळावी म्हणून 500Hz कनेक्टेड बॉल सेन्सर तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. हा सेन्सर चेंडूच्या गतीसोबत स्पर्शाचा अचूक डेटा देतो. त्यामुळे पंचांना निर्णय घेणे सोपे होते. अंतिम सामन्यासाठी या बॉलला गोल्ड, ब्लॅक आणि व्हाईट रंगाचा लूक देण्यात आला आहे. त्याच्या जोडीला गुलाबी आणि लाल ग्राफिक्स जोडण्यात आले आहेत.

Advertisement

नक्की वाचा - FIFA World Cup: 96 वर्षात पहिल्यांदाच मिळणार विजेत्या संघाला 'चॅम्पियनशिप रिंग', किंमत ऐकून बसेल धक्का

​जागतिक फुटबॉलमधील सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या महाकुंभातील सर्व सामने ज्या बॉलने खेळवले गेले, त्याचे थेट कनेक्शन भारताचा शेजारी देश पाकिस्तानशी आहे. पाकिस्तानमधील 'सियालकोट' या शहरात या बॉलची निर्मिती करण्यात आली आहे. जगातील 60 ते 70 टक्के फुटबॉल एकट्या सियालकोटमध्ये बनवले जातात. येथील 'फॉरवर्ड स्पोर्ट्स' (Forward Sports) ही कंपनी 2014 पासून अ‍ॅडिडाससाठी अधिकृत मॅच बॉल तयार करत आहे. पूर्वी हाताने शिवले जाणारे हे बॉल आता अत्याधुनिक 'थर्मल बॉन्डिंग' तंत्रज्ञानाने मशीनद्वारे बनवले जातात.

नक्की वाचा - Rohit Sharma: निवृत्तीनंतर ही रोहीत शर्माची होणार छप्पर फाड कमाई! पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम ऐकून व्हाल हैराण

​फिफा वर्ल्ड कप 2026 चा अंतिम सामना रविवारी स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात खेळवला जाणार आहे. त्याची प्रतिक्षा आता फुटबॉल चाहत्यांना आहे. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळणार आहे. अर्जेंटीना पुन्हा एकदा चॅम्पियन बनण्यासाठी सज्ज आहे. तर स्पेन ही चकीत करण्याची क्षमता ठेवतो. विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून फ्रान्सकडे पाहीले जाते. त्याच फ्रान्सला स्पेनने सेमी फायनलमध्ये पराभूत केले होते. तर अर्जेंटीनाने प्रत्येक सामन्यात आपला क्लास दाखवला आहे. शेवटच्या क्षणात संपूर्ण सामना फिरवण्याचा चमत्कार त्यांनी केला आहे. त्यामुळे फायनल मॅच चुरशीची होणार हे निश्चित आहे.