जाहिरात

FIFA World Cup: 96 वर्षात पहिल्यांदाच मिळणार विजेत्या संघाला 'चॅम्पियनशिप रिंग', किंमत ऐकून बसेल धक्का

फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अर्जेंटीना विरुद्ध स्पेन असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी संपूर्ण वर्ल्डकपमध्ये जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक दिली आहे.

FIFA World Cup: 96 वर्षात पहिल्यांदाच मिळणार विजेत्या संघाला 'चॅम्पियनशिप रिंग', किंमत ऐकून बसेल धक्का
  • फिफा विश्वचषक 2026 च्या विजेत्या संघाला इतिहासात प्रथमच सुवर्णपदक आणि चॅम्पियनशिप रिंग दिले जाणार आहे
  • चॅम्पियनशिप रिंगवर फिफा विश्वचषक ट्रॉफीची प्रतिकृती आणि विजेत्या संघासाठी खास डिझाईन केले जाईल
  • प्रत्येक रिंग खेळाडूंच्या बोटांच्या मापानुसार कस्टमाईज केली जाईल आणि त्याला सत्यतेचे प्रमाणपत्रही मिळेल

फिफा विश्वचषक 2026 च्या विजेत्या संघाला यंदाच्या वर्षी अत्यंत अनोखा आणि ऐतिहासिक बहुमान मिळणार आहे. विश्वचषकाच्या 96 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेत्या संघातील खेळाडू आणि स्टाफला भव्य ट्रॉफी तर मिळणारच आहे. त्याच सोबत सुवर्णपदक ही देण्यात येणार आहे. पण खास गोष्ट म्हणजे त्यांना 'चॅम्पियनशिप रिंग' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. फिफाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. अमेरिकन क्रीडा संस्कृतीतील परंपरेतून प्रेरणा घेऊन फिफाने हा निर्णय घेतला आहे. फिफा वर्ल्डकपमध्ये हे पहिल्यांदाच होत आहे.

खेळाडूंना या ऐतिहासिक विजयाची आठवण कायम राहावी हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या विशेष अंगठीच्या एका बाजूला फिफा विश्वचषक ट्रॉफीची प्रतिकृती असणार आहे.  तर दुसऱ्या बाजूला विजेत्या संघाच्या गरजेनुसार विशेष डिझाईन तयार केली आहे. प्रत्येक अंगठीवर एक युनिक नंबर असणार आहे. ती खेळाडूंच्या बोटांच्या मापानुसार कस्टमाईज केली गेली आहे. तसेच यासोबत एक सत्यतेचे प्रमाणपत्र (Certificate of Authenticity) देखील दिले जाईल. फायनल सामन्यानंतर लगेचच कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षकांना तात्पुरती रिंग दिली जाईल. त्यानंतर संपूर्ण संघासाठी 30 विशेष अंगठ्या तयार केल्या जातील.

नक्की वाचा - Rohit Sharma: निवृत्तीनंतर ही रोहीत शर्माची होणार छप्पर फाड कमाई! पेन्शन म्हणून मिळणारी रक्कम ऐकून व्हाल हैराण

या चॅम्पियनशिप रिंगच्या एकूण 2026 प्रति बनवल्या जाणार आहेत. यातील 30 रिंग विजेत्या संघाला मिळतील, तर उर्वरित 1996 रिंग जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी विक्रीसाठी उपलब्ध असतील. अधिकृत माहिती समोर आली नसली, तरी ही रिंग 14 ते 18 कॅरेट सोन्याची असून त्यात हिरे आणि मौल्यवान खडे असतील. 'गल्फ न्यूज'च्या अहवालानुसार, एका रिंगची किंमत सुमारे 1.50 लाख डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 25 लाख ते 1.45 कोटी रुपये असू शकते. या महामुकाबल्यात युरोपियन चॅम्पियन स्पेन आणि गतविजेता अर्जेंटिना आमनेसामने आहेत.

नक्की वाचा - Rohit Sharma: 'मुंबईचा राजा' क्रिकेट सोडणार! रोहितच्या रिटायरमेंटचा सामना ठरला? सर्वात शॉकिंग INSIDE स्टोरी

फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अर्जेंटीना विरुद्ध स्पेन असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी संपूर्ण वर्ल्डकपमध्ये जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ जेतेपदासाठी संघर्ष करताना दिसतील. जगभरातून त्यांचे चाहते हा सामना पाहण्यासाठी अमेरिकेत दाखल झाले आहेत. त्यामुळे फिफा वर्ल्डकप कोण जिंकणार याची उत्सुकता आतापासूनच चाहत्यांमध्ये आहे. मेस्सी आणि कंपनीला टक्कर देण्यासाठी स्पेनचा संघ सज्ज झाला आहे. आता फक्त फायनलची प्रतिक्षा आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com