इंटरनॅशनल मास्टर्स लीगच्या अंतिम सामन्यात इंडिया मास्टर्सच्या संघाने वेस्ट इंडिज मास्टर्सचा 6 विकेट्सने पराभव करत विजेतेपदावर नाव कोरले. या सामन्यात अंबाती रायुडूने शानदार फलंदाजी करत 50 चेंडूत 74 धावा केल्या. रायुडूला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी सामनावीराचा किताब देण्यात आला. रायुडूची तुफान फटकेबाजी आणि इंडिया मास्टर्सच्या विजयापेक्षाने युवराज सिंग आणि टिनो बेस्टमध्ये वाद झाला चर्चेत राहिला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
युवराज सिंग आणि टीनो बेस्ट यांच्यातील वादामुळे मैदानातील वातावरण तापलं होतं. अगदी ब्रायन लारा देखील आला आणि त्याने भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला. पण टिनो बेस्ट युवीसोबत वाद घालत राहिला. अशा परिस्थितीत अंपायरनी हस्तक्षेप करून दोघांनाही शांत केले.
(नक्की वाचा- IPL Most Sixes: ना रोहित ना कोहली, IPL मध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचे रेकॉर्ड कुणाच्या नावावर?)
युवी आणि बेस्ट यांच्या वादाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मात्र मैदानात एकमेकांवर तुटून पडलेले युवी आणि बेस्ट नंतर एकमेकांशी बोलत असल्याचे दिसून आले. दोघांच्या खेळाडूवृत्तीने प्रेक्षकांचं मन जिंकलं.
(नक्की वाचा- Virat Kohli : T20I क्रिकेटमधील निवृत्ती मागं घेण्यास विराट तयार, टीमसमोर ठेवली खास अट)
सचिननेही सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि 18 चेंडूत 25 धावा कुटल्या. सचिनने त्याच्या खेळीदरम्यान एक अप्परकटही मारला. ज्यामुळे चाहत्यांना 2003 च्या विश्वचषकात अख्तरच्या चेंडूवर मारलेल्या प्रसिद्ध षटकाराची आठवण झाली.ब्रायन लाराची बॅट मात्र शांत राहिली. लाराने अंतिम सामन्यात अवघ्या 6 धावा केल्या.
अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 148 धावा केल्या. त्यानंतर इंडिया मास्टर्स संघाने 17.1 षटकांत 4 विकेट गमावून विजय मिळवला. युवराज सिंगने सामन्यात 11 चेंडूत 13 धावांची नाबाद खेळी केली. तर स्टुअर्ट बिन्नीने 9 चेंडूत 16 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.