
इंडियन प्रीमियर लीग (IP) ही जगातील सर्वात खडतर T20 स्पर्धा मानली जाते. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील खेळाडूंमध्ये जोरदार चुरस असते. सर्वच आयपीएल फ्रँचायझी चांगले खेळाडूंना हेरण्यासाठी जगभर शोधमोहिम राबवतात. पण, गेल्या तीन आयपीएल सिझनमध्ये अनसोल्ड ठरलेल्या एका बॅटरनं जागतिक क्रिकेटमध्ये जबरदस्त धमाका केलाय. त्यानं एकाच इनिंगमध्ये सिक्सर्सचा पाऊस पाडला. त्याचबरबरोबर T20 क्रिकेटचा बॉस समजल्या जाणाऱ्या ख्रिस गेलचा (Chris Gayle) वर्ल्ड रेकॉर्डही मोडला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मेजर लीग क्रिकेट 2025 चा पहिला सामना आज (13 जून) सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्नस आणि वॉशिंग्टन फ्रीडम यांच्यात ओकलंड कोलिजीयममध्ये झाला. या मॅचमध्ये न्यूझीलंड क्रिकेट टीमचा स्फोटक ओपनर फिन ॲलनने (Finn Allen) अनेक रेकॉर्ड मोडले आहेत.
फिन आता T20 क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये सर्वात जास्त सिक्सर्स लगावणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल आणि स्टोनियाचा साहिल चौहान यांच्या नावावर संयुक्तपणे होती. या दोघांनीही एका T20 मॅचमधील एका इनिंगमध्ये प्रत्येकी 18-18 सिक्स लगावले होते. पण, फिन ॲलनने वॉशिंग्टन फ्रीडमविरुद्ध 19 सिक्स लगावत नव्या रेकॉर्ड केला आहे.
( नक्की वाचा : Mumbai Indians : मुंबई इंडियन्स 'इन अॅक्शन' पुढील सिझनपूर्वी रोहित शर्मासह 5 जणांची होणार हकालपट्टी? )
सर्वात फास्ट 150
इतकंच नाही तर फिन ॲलन टी-20 च्या एका मॅचमध्ये सर्वात जलद 150 रन्स करणारा जगातील पहिला खेळाडू देखील बनला आहे. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्नसकडून खेळताना त्याने फक्त 49 बॉल्समध्ये 150 रन्सचा टप्पा ओलांडला.
फिननं या मॅचमध्ये फक्त 51 बॉल्समध्ये 296.08 च्या दणदणीत स्ट्राइक रेटने 151 रन्स केले. या खेळीत त्यानं 5 फोर आणि 19 सिक्स लगावले.
FINN ALLEN SMASHED 151* (51) WITH 19 SIXES IN THE MLC. 🥶
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 13, 2025
- The most sixes in a T20 innings. pic.twitter.com/7EOnaxkaw9
मॅच कुणी जिंकली ?
या मॅचमध्ये टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करणाऱ्या सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्नसनं 20 ओव्हर्समध्ये 5 आऊट 269 रन्स केले. फिन ॲलनने सर्वाधिक 151 रन्स काढले. 270 रन्सचा पाठलाग करताना वॉशिंग्टन फ्रिडमची टीम 13.1 ओव्हर्समध्ये 146 रन्सवरच आटोपली. रचिन रविंद्रने 17 बॉलमध्ये 42, तर मिचेल ओवेननं 20 बॉलमध्ये 39 रन्स काढले. त्यानंतरही वॉशिंग्टनला विजय मिळवता आला नाही. त्यांना 123 रन्सनं मोठा पराभव सहन करावा लागला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world