David Johnson : टीम इंडियाचा माजी कसोटीपटू डेव्हिड जॉन्सनचं निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

Former Cricketer David Johnson टीम इंडिया आणि कर्नाटकचा माजी कसोटीपटू डेव्हिड जॉन्सनचं बंगळुरुमध्ये निधन झालंय.

Advertisement
Read Time: 1 min
David Johnson
मुंबई:

Former Cricketer David Johnson :  टीम इंडिया आणि कर्नाटकचा माजी कसोटीपटू डेव्हिड जॉन्सनचं बंगळुरुमध्ये निधन झालंय. तो 52 वर्षांचा होता. डेव्हिडनं त्या घराच्या चौथ्या मजल्याच्या बाल्कनीवरुन पडल्यानं त्याचा मृत्यू झाला. त्यानं आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. जॉन्सनच्या निधनानंच वृत्त समजताच बंगळुरु पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचा मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे.

डेव्हिड जॉन्सनच्या आत्महत्येचं वृत्त समजताच क्रिकेट विश्वावर शोककळा पसरलीय. अनेक क्रिकेट फॅन्सनी सोशल मीडियावरुन त्याला श्रद्धांजली दिलीय. टीम इंडियाचा माजी कॅप्टन अनिल कुंबळे, बीसीसीआय सचिव जय शहा यांनी जॉन्सनच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय. 

Advertisement

जॉन्सनची क्रिकेट कारकीर्द

जॉन्सनच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे. त्यानं 1996 साली दोन टेस्ट मॅच खेळल्या. त्यामध्ये 3 विकेट्स घेतल्या. जॉन्सननं देशांतर्गत क्रिकेटमध्ये 39 फर्स्ट क्लास मॅच खेळल्या. त्यामध्ये 125 विकेट्स घेतल्या. जॉन्सननं 1995-96 च्या रणजी ट्रॉफी सिझनमध्ये  केरळविरुद्ध 152 रन देत 10 विकेट्स घेत भारतीय क्रिकेटमध्ये खास ओळख बनवली होती. 

Advertisement

डेव्हिड जॉन्सननं 1996 साली नवी दिल्लीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात मायकल स्लॅटरची विकेट त्यानं घेतली होती.


 

Topics mentioned in this article