भारतीय क्रिकेट टीमचे दिग्गज खेळाडू विराट कोहली आपल्या खेळासह कमाई करण्यातही टॉपवर राहिले आहेत. क्रिकेट व्यतिरिक्त विराट कोहली वेगवेगळ्या माध्यमातून चांगलीच कमाई करीत आहेत. ब्रँड इंडोर्समेंट (Brand Endorsement) सह त्यांनी विविध कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. याच कारणास्तव ही मंडळी टॅक्सच्या माध्यमातून एक मोठी रक्कम भारत सरकारला टॅक्सच्या रुपात देतात. फॉर्च्युन इंडियाने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. या यादीत त्यांनी टॅक्स देणाऱ्या खेळाडूंची नावं (Highest Tax Paying Sportsmen) जाहीर केली आहेत. या यादीत विराट कोहली पहिल्या स्थानावर आहेत.
विराट कोहली पहिल्या स्थानावर...
भारतीय क्रिकेट टीमचे जबरदस्त फलंदाज विराट कोहली मैदानावर तर चॅम्पियन आहेतच, मात्र कमाईबद्दल सांगायचं झालं तर ते तिथेही पहिल्या स्थानावर आहेत. विराट कोहली बीसीसीआय आणि आयपीएलकडून मिळणाऱ्या पगाराव्यतिरिक्त ब्रँड जाहिरातीतून कोट्यवधी कमावतात. याच कारणास्तव त्यांचा नेटवर्थ 1050 कोटींहून अधिक आहे. चांगली कमाई असल्यामुळे विराट कोहली आता टॅक्स प्रकरणात सर्वांना मागे सोडलं आहे. फॉर्च्युन इंडियाच्या रिपोर्टनुसार, विराट कोहलीने यंदा 66 कोटी टॅक्स दिला आहे. त्यामुळे विराट कोहली सर्वाधिक टॅक्स देणारे खेळाडू ठरले आहेत.
महेंद्रसिंह धोनीही कमी नाही...
भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन महेंद्र सिंह धोनीही मागे नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर त्यांची कमाई रॉकेटच्या गतीने वाढली आहे. क्रिकेटर होण्यासह ते एक चांगला व्यावसायिकही आहेत. त्यांचा नेटवर्थ एक हजार कोटींच्या पार पोहोचला आहे. याच कारणास्तव धोनीने यंदा एकूण 38 कोटींचा टॅक्स दिला आहे आणि विराट कोहलीनंतर सर्वाधिक टॅक्स देणारे दुसरे खेळाडू ठरले आहेत.
नक्की वाचा - 'जग तुझ्यावर थुंकेल', कपिल देवबद्दल काय म्हणाले युवराजचे वडील?
मास्टर ब्लास्टरने किती भरला टॅक्स...
भारतीय क्रिकेट टीमचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरदेखील टॅक्स देण्याच्या बाबतीत विराट कोहली आणि एमएस धोनीहून कमी नाहीत. सचिनने क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर वेगवेगळ्या व्यवसायात खूप गुंतवणूक केली आहे. त्याचा नेटवर्थ आज तब्बल 14 कोटी झाला आहे. टॅक्स देणाऱ्यांच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिपोर्टनुसार सचिन तेंडुलकरने 28 कोटींचा टॅक्स भरला आहे.
सौरभ गांगुली चौथ्या स्थानावर तर पाचव्यावर कोण?
सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सौरभ गांगुली चौथ्या स्थानावर आहेत. सौरभची कमाई मुख्यत: व्यवसाय आणि ब्रँड इंडोर्समेंट (Brand Endorsement) सह आयपीएलने होते. रिपोर्टनुसार सौरभ गांगुलीने यंदाच्या वर्षी 23 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. त्यांची नेटवर्थ साधारण 600 कोटींच्या पार आहे. हार्दिक पांड्या पाचव्या स्थानावर असून त्यांनी 13 कोटींचा टॅक्स दिला आहे.