Warm up मॅचपूर्वी टीम इंडियासाठी 2 चांगल्या बातम्या, गुरु-शिष्य खूश

Good news for Team India : शनिवारी होणाऱ्या प्रॅक्टीस मॅचपूर्वी टीम इंडियासाठी 2 आनंदाच्या बातम्या आहेत. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

Good news for Team India before warm up match: टी20 वर्ल्ड कप दुसऱ्यांदा जिंकण्यासाठी भारतीय टीम सध्या जोरदार मेहनत घेत आहे. टीम इंडिया सध्या अमेरिकेत जोरदार सराव करत आहे. भारतीय टीमचा या स्पर्धेतील पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी 1 जून (शनिवार) रोजी स्वत:ची तयारी चाचपण्याची संधी टीम इंडियाला मिळेल. शनिवारी होणाऱ्या प्रॅक्टीस मॅचपूर्वी टीम इंडियासाठी 2 आनंदाच्या बातम्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रोहित-द्रविड खुश

भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध नासाऊ कौंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर होणार आहे. याच मैदानात भारताची लढत पारंपरिक प्रस्पिर्धी पाकिस्तानशी देखील होईल. या महत्त्वाच्या लढतींपूर्वी टीम इंडियाचा कॅप्टन आणि कोचनं स्टेडियमचा दौरा केला. राहुल आणि रोहित पिच पाहून खूश आहेत. त्यांना हे पिच सामान्य आणि चांगलं वाटलंय. या पिचवर फलंदाजांना चांगली कामगिरी करण्यासाठी मदत मिळेल, अशी या दोघांनाही आशा आहे. 

( नक्की वाचा : 'तुम्हाला मला निवडावंच लागेल', IPL गाजवणाऱ्या भारतीय खेळाडूचं मोठं वक्तव्य )
 

हार्दिकनं गाळला बॉलिंगमध्ये घाम

टीम इंडियाला दुसरी गुड न्यूज हार्दिक पांड्याकडून मिळालीय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिकनं जवळपास 40 मिनिटं नेटमध्ये बॉलिंग केली. इतकंच नाही तर त्यानं बॅटिंगमध्येही जोरदार मेहनत केली आहे. त्यानं सराव सत्रात जवळपास 1 तास बॅटिंग केलीय. आयपीएलच्या कटू आठवणी मागं टाकत टी20 वर्ल्ड कपमध्ये जलवा दाखवण्यासाठी सिद्ध असल्याचे संकेत हार्दिकनं यामधून दिलेत. भारतीय फॅन्ससाठी ही चांगली बातमी आहे. 
 

Topics mentioned in this article