
स्कीअर या खेळासाठी आंतरराष्ट्रीय स्की फेडरेशनचं चीन इथलं शिबीर हे प्रतिष्ठेचं समजलं जातं. जगातल्या नामांकीत खेळाडूंना या शिबीरात सहभागी होता येतं. या शिबीरासाठी भारताकडून तीन कश्मिरी तरुणींची निवड झाली आहे. काश्मिरी स्कीअर्स हजिका बिंटे फारूक, अयान तारिक आणि फैजान अहमद लोन यांची निवड झाली आहे. तर हिमाचल प्रदेशातील जन्नत ठाकूर हिची ही निवड झाली आहे. त्यांचे प्रशिक्षक मेहराज दिन दार यांची चीनमधील बीजिंग येथे या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्की फेडरेशनच्या शिबीरात आपला सहभाग नोंदवला आहे. 19 फेब्रुवारी रोजी चीनमधील बीजिंग येथील प्रसिद्ध यानकिंग स्की रिसॉर्ट इथं याचं आयोजन करण्यात आलं होतं. 1 मार्चपर्यंत हे शिबीर चाललं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या चार जणींमध्ये हजिका बिंटे फारूक हीचे सर्वात चांगले रेकॉर्ड आहे. भारताची स्कीअरमधील रायजींग स्टार म्हणून ती ओळखली जाते. तिने आतापर्यंतच्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धामध्ये गोल्ड मिडेल मिळवले आहेत. उत्तराखंड इथे झालेली राष्ट्रीय स्की चॅम्पियनशिपमध्ये तिने विजेतेपद मिळवले होते. त्याच बरोबर खेलो इंडिया विंटर गेमचे ही विजेतेपद तिच्या नावावर आहे. इंडियन आर्मी मार्फत आयोजित केलेल्या चिनार विंटरगेमध्ये ही हाझिका हीने आपली छाप पाडली आहे.
ट्रेंडिंग बातमी - IND vs NZ : टीम इंडियाला Good News, संपूर्ण देशाला रडवणारा खेळाडू फायनलमधून आऊट?
हजिका फारूक हिचे शालेय शिक्षण श्रीनगरमध्ये झाले. त्यानंतर ती आता नवी दिल्लीमध्ये शिक्षण घेत आहे. तिचे वडील आणि आई हे शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत. ती फारूक अहमद यांची कन्या आहे. ते ही शैक्षणिक क्षेत्रता कश्मीरमध्ये काम करतात. भारताचे प्रतिनिधीत्व मुलीने केल्याचा त्यांना आनंद आहे. मुलीने आंतरराष्ट्रीय पातळीवर देशासाठी पदक जिंकावे अशी त्यांची इच्छा आहे. आपली मुलगी एक ना एक दिवस हे पदक देशासाठी नक्की जिंकेल असा त्यांना विश्वास आहे. चीनमध्ये झालेले हे शिबिर प्रतिष्ठेचे समजले जाते.
हजिका फारूक हीने कश्मिरी मुलांसमोर एक उत्तम उदाहरण ठेवलं आहे. तिच्या दोन सहकाऱ्यांनीही ही बाब दाखवून दिली आहे. कश्मिरी तरुणी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज आहेत, हेच त्यांना दाखवून दिलं आहे. येणाऱ्या काळात ऑलिम्पिक मेडल जिंकण्याची इच्छा हजिकाची आहे. त्या दृष्टीने ती प्रयत्न ही करत आहे. राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्यानंतर तिचे लक्ष आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world