जाहिरात

IND vs NZ : टीम इंडियाला Good News, संपूर्ण देशाला रडवणारा खेळाडू फायनलमधून आऊट?

India vs New Zealand, Champions Trophy 2025 Final : दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवत फायनल गाठलेल्या न्यूझीलंडसाठी एक काळजीची बातमी आहे.

IND vs NZ : टीम इंडियाला Good News, संपूर्ण देशाला रडवणारा खेळाडू फायनलमधून आऊट?
मुंबई:

India vs New Zealand, Champions Trophy 2025 Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल मॅच रविवारी (9 मार्च) मुंबईत होणार आहे. या संपूर्ण स्पर्धेत भारतीय टीमनं एकही सामना गमावलेला नाही. सेमी फायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केलाय. भारताला 2013 नंतर ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. दुसरिकडं न्यूझीलंडनं 2000  साली ही स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर 25 वर्ष सातत्यानं त्यांना या स्पर्धेच्या विजेतेपदानं हुलकावणी दिली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवत फायनल गाठलेल्या न्यूझीलंडसाठी एक काळजीची बातमी आहे. त्यांचा प्रमुख बॉलर मॅट हेन्री (Matt Henry) फायनलमध्ये खेळणे निश्चित नाही. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध लाहोरमध्ये झालेल्या सेमी फायनलमध्ये फिल्डिंग करताना खांदा दुखावला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले होते. 

मॅट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मॅचमध्ये फिल्डिंग करताना खांद्यावरच कोसळला होता. त्यामुळे तो खूप अस्वस्थ आहे. आमच्या दृष्टीनं चांगली बाब म्हणजे त्यानं बॉलिंग करण्यास सुरु केलं आहे, अशी माहिती न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टेड यांनी दिली. तो रविवारची मॅच खेळेल अशी आम्हाला आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.

Mohammed Shami : टीम इंडियाचा हिरो शरियतचा गुन्हेगार! का संतापले मौलाना?

( नक्की वाचा :  Mohammed Shami : टीम इंडियाचा हिरो शरियतचा गुन्हेगार! का संतापले मौलाना? )

भारताविरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड

मॅट हेन्री रविवारी फायनल खेळण्यास उतरला नाही तर तो भारतीय टीमसाठी मोठा दिलासा असेल. हेन्रीचा भारताविरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 2019 मधील वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये हेन्रीच्या एका स्पेलमध्ये टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला होता.

हेन्रीनं त्या सेमी फायनलमध्ये रोहित शर्मा, केएल राहुल आणि दिनेश कार्तिक या टॉप ऑर्डरमधील तीन प्रमुख खेळाडूंना आऊट केलं. 10 ओव्हरमध्ये 37 रन्स करत 3 विकेट्स घेतल्या होत्या. या कामगिरीसाठी त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. 2019 साली वन-डे वर्ल्ड कप जिंकण्याचं संपूर्ण देशांचं स्वप्न हेन्रीमुळे मोडलं होतं. 

हेन्रीनं भारताविरुद्ध आत्तापर्यंत 11 वन-डे मॅचमध्ये 21 विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेतील साखळी फेरीच्या सामन्यात त्यानं भारताविरुद्ध पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील 4 मॅचमध्ये त्यानं 10 विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या बॉलर्सच्या यादीत हेन्री नंबर 1 वर आहे. फॉर्मात असलेला आणि मुख्य म्हणजे भारतीय टीमला डोकेदुखी ठरणारा हेन्री सध्या दुखापतग्रस्त आहे. या दुखापतीमुळे तो फायनल खेळला नाही, तर हा न्यूझीलंडसाठी मोठा धक्का असेल. तर भारतीय टीमला मोठा दिलासा असणार आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: