Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आपली गर्लफ्रेंड माहिका शर्मा हिला 1.7 कोटी रुपयांची आलिशान 'मर्सिडीज' कार भेट दिली आहे. पांड्याच्या या कृतीने सर्वांचे लक्ष वेधलं असून सोशल मीडियावर त्याचे प्रचंड कौतुक केलं जातंय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पांड्या शोरूममध्ये माहिका शर्मासोबत नवीन लक्झरी गाडीची डिलिव्हरी घेताना दिसत आहे. जिथे काही चाहत्यांनी त्याच्या या रोमँटिक अंदाजाचे कौतुक केले आहे, तर काहींनी भविष्यात अशा अफाट खर्चामुळे फायद्याऐवजी नुकसानच जास्त होऊ शकते, असेही मत व्यक्त केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच हार्दिकचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो त्याच्या नवीन 'फेरारी 12सिलिंड्री' (Ferrari 12 Cilindri) कारमध्ये दिसला होता. या कारची किंमत साधारण 12 कोटी रुपये असल्याचे म्हटलं जातंय.
Mercedes-Benz V classची किती आहे किंमत?
Mercedes-Benz V class: सुमारे 1.7 कोटी रुपये आहे.
मागील महिन्यातही हार्दिक पांड्या चर्चेत होता, कारण या स्टार क्रिकेटरने त्याचा मुलगा अगस्त्य पांड्या आणि नताशा स्टेनकोविकला 'लँड रोव्हर डिफेंडर'कार भेट दिली होती, ज्याची भारतात किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे.
(नक्की वाचा: Dhurandhar Vs Dhanandhar Video: रणवीर सिंगचा धुरंधर की अशोक सराफांचा धनंधर? सोशल मीडियावर या व्हिडीओचा धुमाकूळ)
हार्दिकने आतापर्यंत खरेदी केलेल्या लक्झरी कार
- Land Rover Defender: 4 कोटी रुपये
- Ferrari: 12 कोटी रुपये
- Mercedes-Benz V class: 1.7 कोटी रुपये
आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात मुंबईचा विजय
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सने आपल्या प्रवासाची सुरुवात विजयाने केली आहे. रोहित शर्मा आणि रयान रिकल्टन यांच्या झंझावाती बॅटिंगच्या जोरावर मुंबईने रविवारी (29 मार्च) वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) 6 विकेट्सने पराभव केला. दुसरीकडे मुंबईच्या विजयात शार्दुल ठाकूरने आपल्या बॉलिंगने महत्त्वाची भूमिका बजावली आणि 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब पटकावला.