जाहिरात

Dhurandhar Vs Dhanandhar Video: रणवीर सिंगचा धुरंधर की अशोक सराफांचा धनंधर? सोशल मीडियावर या व्हिडीओचा धुमाकूळ

Dhurandhar Vs Dhanandhar Video: सोशल मीडिया क्रीएटर सुमित पाटील याने 'धुरंधर' चित्रपटातील रणवीर सिंगच्या भावुक सीनला 'अशी ही बनवाबनवी'मधील अशोक सराफ आणि सुधीर जोशी यांच्या पात्रांची जोड देऊन एक भन्नाट व्हिडीओ तयार केला आहे.

Dhurandhar Vs Dhanandhar Video: रणवीर सिंगचा धुरंधर की अशोक सराफांचा धनंधर? सोशल मीडियावर या व्हिडीओचा धुमाकूळ
"Dhurandhar Vs Dhanandhar Video: अशोक मामांचा 'धनंधर' व्हिडीओ पाहिला का?"
Sumit Patil And Social Media

Dhurandhar Vs Dhanandhar Video: सध्या बॉक्स ऑफिसवर बॉलिवूड सिनेमा 'धुरंधर' (Dhanandhar) धुमाकूळ घालत आहे. या सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत. विशेषतः सिनेमातील अभिनेता रणवीर सिंगचा शेवटचा सीन अतिशय भावुक करणारा आहे. सिनेमातील हे दृश्य डोळ्यात पाणी आणणारे आहे. पण सोशल मीडिया कंटेंट क्रीएटर सुमित पाटील याने एक आगळीवेगळी शक्कल लढवत 'धुरंधर'मधील हा सीन आणि मराठी प्रेक्षकांचा जीव की प्राण असलेला 'अशी ही बनवाबनवी' सिनेमातील काही पात्रांसह एक वेगळाच व्हिडीओ तयार केला आहे. या व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला असून प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे.

'धनंधर'च्या व्हिडीओने वेड लावलं 

सुमितने 'धुरंधर' सिनेमातील त्या भावुक सीनचा आधार घेतला आहे, जेथे रण वीर सिंग आपल्या मिशननंतर मायदेशी परततो. पण यात त्याने 'अशी ही बनवाबनवी' मधील अशोक सराफ (धनंजय माने), सुधीर जोशी (विश्वासराव) आणि लता थत्ते (मालकीण) यांच्या पात्रांचा वापर केला आहे. ज्यामध्ये त्याने अशोक सराफ यांनी साकारलेले धनंजय माने यांचे पात्र रणवीरच्या जागी दाखवलंय. AIच्या मदतीने तयार केलेल्या या व्हिडीओमध्ये 'Dhanandhar माने इथेच राहत होते' अशा आशयाचे मजेशीर टेक्स्ट वापरण्यात आले आहे. तसेच घरमालक, जुनी केरसुणी आणि 70 रुपयांच्या हिशोबावरून केलेले भाष्य पाहून आजही प्रेक्षकांना हसू आवरत नाही.

(नक्की वाचा: Aai Bhadyane Havi? Movie: 'आई भाड्याने हवी?' केदार शिंदे आणि सना शिंदेचा नेमका विषय काय?)

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

या रीलवर प्रेक्षकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने उपरोधिकपणे म्हटले की, "इस्राइलहून औषधं आणणं आता थोडं कठीण आहे", तर दुसऱ्याने अशोक मामांचे कौतुक करत "महाराष्ट्र चे अशोक मामा... ऑल टाइम फेव्हरेट" अशी कमेंट केली आहे. अनेकांनी हा व्हिडीओ पाहून हसून हसून डोळ्यात पाणी आल्याची पावती दिली आहे.

(नक्की वाचा: Success Story: 7व्या वर्षी सोडावं लागलं घर; आज आहे कोट्यवधींची मालकीण, मिस इंडिया स्पर्धा ते राजकारण वाचा यशस्वी प्रवास)

धनंधर मानेंचा व्हिडीओ पाहा

'धुरंधर'पेक्षा 'धनंधर' भारी!

मराठी प्रेक्षकांसाठी रणवीर सिंगच्या 'धुरंधर'पेक्षा अशोक सराफ यांनी साकारलेला 'धनंजय माने' अर्थात 'धनंधर' नेहमीच वरचढ ठरतो, हे या व्हिडीओतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. जुन्या आठवणींना उजाळा देत नव्या ट्रेंडचा वापर करून बनवलेला हा 'कॉमेडी रील' सध्या मराठी इंटरनेट विश्वात चर्चेचा विषय ठरला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com