जाहिरात

Women's T20 WC : पाकिस्तानच्या विजयाची भारत करणार प्रार्थना, टीम इंडियाच्या कोचनं दिल्या शुभेच्छा

ICC Women's T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर सेमी फायनल गाठण्यासाठी भारतासाठी एकच समीकरण शिल्लक आहे.  

Women's T20 WC : पाकिस्तानच्या विजयाची भारत करणार प्रार्थना, टीम इंडियाच्या कोचनं दिल्या शुभेच्छा
India women's cricket team, Photo X (Twitter)
मुंबई:

ICC Women's T20 World Cup 2024 : यूएईमध्ये सुरु असलेल्या महिला टी20 वर्ल्ड कपची सेमी फायनल स्वबळावर गाठण्याची संधी टीम इंडियानं गमावली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा 9 रननं पराभव केला. सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियानं दिलेलं 152 रनचं आव्हान चांगल्या रनरेटसह पूर्ण करण्याचं टीम इंडियाला गरज होती. पण, भारतीय क्रिकेट टीमला ऑस्ट्रेलियाला पराभूतही करता आलं नाही. भारतानं हा सामना 9 रननं गमावला. कॅप्टन हरमनप्रीत कौरची झुंज अपयशी ठरली.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे पॉईंट टेबल?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाल्यानंतरही टीम इंडियाला अजूनही सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे. भारताचे 4 मॅचनंतर 2 विजय आणि तितक्याच पराभवानं 4 पॉईंट्स आहेत. टीम इंडिया पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचेही 3 मॅचनंतर 2 विजयासह 4 पॉईंट्स आहेत. पण, भारताचा नेट रन रेट (0.322) न्यूझीलंड टीमपेक्षा  (0.282)  चांगला आहे. त्यामुळे भारतीय टीम अजूनही दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता सेमी फायनल गाठण्यासाठी भारतासाठी एकच समीकरण शिल्लक आहे.  

पाकिस्तानच्या विजयाची गरज

भारतीय महिला क्रिकेट टीमचं संपूर्ण लक्ष न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या सोमवारी होणाऱ्या मॅचकडं आहे. या मॅचमध्ये न्यूझीलंडचा पाकिस्तानकडून पराभव झाला तर हरमनप्रीत कौरच्या टीमला सेमी फायनलचं तिकीट मिळेल. पण, न्यूझीलंडनं पाकिस्तानचा पराभव केला तर भारतीय टीमचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात येईल. ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतरही भारताचा नेट रन रेट न्यूझीलंडपेक्षा चांगला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पाकिस्तान विजयी व्हावा अशी प्रार्थना सर्वसामान्य भारतीय फॅन्स करणार आहेत. 

IND vs AUS:  रोहित शर्मा नसेल कर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? इथं वाचा उत्तर

( नक्की वाचा :  IND vs AUS: रोहित शर्मा नसेल कर कोण होणार टीम इंडियाचा कॅप्टन? इथं वाचा उत्तर )

टीम इंडियाचे कोच काय म्हणाले?

ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पराभवानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय महिला क्रिकेट टीमचे हेड कोच अमोल मुझुमदार यांना सेमी फायनलच्या समीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी अमोल मुझुमदार हसले. 'हा एक चांगला प्रश्न आहे. मी पाकिस्तानला शुभेच्छा देतो. मी फक्त इतकं सांगू शकतो, आम्ही ही मॅच बारकाईनं पाहणार आहोत, हे नक्की आहे.'
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसणारा सिराज लवकरच 'खाकी'त दिसणार, तेलंगणा सरकारकडून मोठं गिफ्ट
Women's T20 WC : पाकिस्तानच्या विजयाची भारत करणार प्रार्थना, टीम इंडियाच्या कोचनं दिल्या शुभेच्छा
Australia Cameron Green ruled out of Border-Gavaskar Trophy and ipl 2025 also
Next Article
RCB ने 17.5 कोटींना विकत घेतलेला हा खेळाडू IPL खेळू शकणार नाही, काय आहे कारण?