
ICC Champions Trophy 2025, IND vs NZ : टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दमदार सुरुवात केली आहे. भारतानं बांगलादेश आणि पाकिस्तानविरुद्धच्या लढती जिंकत सेमी फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. आता टीम इंडियाची शेवटची लढत रविवारी (2 मार्च) न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. भारताप्रमाणे न्यूझीलंडचंही सेमी फायनलमधील स्थान पक्कं आहे. पण, दोन्ही टीम विजयी अभियान कायम राखत पहिल्या क्रमांकासह सेमी फायनलमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतील. दुबईत होणाऱ्या या मॅचमध्ये टीम इंडियामध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे त्याला विश्रांती देण्याचा विचार टीम मॅनेजमेंट करत आहे. त्या परिस्थितीमध्ये ऋषभ पंत खेळू शकतो. रोहित प्रमाणेच टीम मॅनेजमेंट अनुभवी फास्ट बॉलर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) विश्रांती देण्याचा विचार करत आहे. अर्थात शमीला न खेळवण्याचं कारण वेगळं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे कारण?
न्यूझीलंडच्या टीममध्ये पाच डावखुरे बॅटर आहेत. त्यामुळे टीम इंडिया या मॅचमध्ये शमीच्या जागी डावखुरा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) खेळवण्याचा विचार करत आहे. शुक्रवारी झालेल्या टीम इंडियाच्या सराव सत्रामध्येही याचे संकेत मिळले आहेत.
शुक्रवारच्या सराव सत्रामध्ये अर्शदीपनं बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केलच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण रन-अपसह 13 ओव्हर्स बॉलिंग केली. तर शमीनं फक्त 6-7 ओव्हर्सच टाकल्या. त्यानं कमी रन-अपमध्ये हे ओव्हर्स टाकले. त्यावेळी तो पूर्ण भरातही दिसला नाही. शमी वन-डे वर्ल्ड कप 2023 नंतर दुखापतीमुळे एक वर्षांपेक्षा जास्त टीम इंडियाच्या बाहेर होता. त्यानं नुकतंच टीममध्ये कमबॅक केलं आहे.
( नक्की वाचा : IND vs NZ : न्यूझीलंडच्या मॅचमध्ये बदलणार टीम इंडियाचा कॅप्टन? रोहित शर्मानं वाढवलं टेन्शन )
पाकिस्तानविरुद्ध 23 फेब्रुवारी रोजी झालेल्या सामन्यात इनिंगमधील तिसऱ्या ओव्हरनंतरच शमीनं त्याच्या उजव्या पायावर उपचार घेतले होते. शुक्रवारच्या प्रॅक्टीस सेशनमधील शमीच्या देहबोलीनुसार त्याला सेमी फायनलपूर्वी विश्रांती मिळण्याची शक्यता आहे, असंच दिसत होतं.
भारताचा अनुभवी खेळाडू केएल राहुलनं पत्रकारांशी बोलताना टीम इंडियातील बदलावर कोणतीही नेमकी माहिती दिली नव्हती. पण सहाय्यक कोच रायन टेन डोशहाट बॉलिंगमध्ये बदल होण्याचे संकेत दिले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world