जाहिरात

Champions Trophy Final 2025: रोहितला 'टॉसचा बॉस' व्हावेच लागेल! फायनलमध्ये नाणेफेक महत्त्वाची; काय सांगतात आकडे?

India Vs New Zealand Champions Trophy Final 2025: कारण पहिल्या डावात संघाने 290-300 पर्यंत धावा केल्या तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघासमोर मोठे आव्हान उभे राहील.

Champions Trophy Final 2025: रोहितला 'टॉसचा बॉस' व्हावेच लागेल! फायनलमध्ये नाणेफेक महत्त्वाची; काय सांगतात आकडे?

Champions Trophy Final 2025: भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध आज चॅम्पियन्स ट्रॉफीमधील फायनलची लढत होत आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी मैदानात उतरतील. टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत चमकदार कामगिरी करत फायनलमध्ये धडक मारली तर दुसरीकडे न्यूझीलंडनेही सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला धुळ चारली. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने ट्रॉफी कोण उंचावणार याकडे क्रिडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

टीम इंडियासाठी टॉस जिंकणे महत्त्वाचे...

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायलनमध्ये रोहितसाठी नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे आहे कारण गेल्या 10 सामन्यांचा त्याचा रेकॉर्ड खराब आहे. जर आपण गेल्या 10 सामन्यांचे निकाल पाहिले तर, पाठलाग करणाऱ्या संघाने 7 सामने जिंकले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने आतापर्यंत धावांचा पाठलाग करताना 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. त्याच वेळी टीम इंडियाने एकदा न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करून सामना जिंकला होता.

काय सांगतात आकडे?

खरं तर, दुबई स्टेडियमची खेळपट्टी खूपच संथ आहे. पण या खेळपट्टीवर संध्याकाळी फ्लडलाइट्सखाली थोडीशी फलंदाजी करणे सोपे मानले जाते. तर दुपारी फलंदाजी करणारा संघ मोठा धावा काढण्यात अपयशी ठरतो. गेल्या 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये, या मैदानावर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला पाच वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यापैकी टीम इंडियाने 4 जिंकले आहेत,ज्यामध्ये रोहितने गेल्या चारही सामन्यांमध्ये टॉस गमावला आहे.

ट्रेंडिंग बातमी - Pune Crime: सट्टेबाजी, खंडणी अन् तुरुंगवास.., अश्लील कृत्य करणारा पुण्यातील तरुण कोण? A टू Z माहिती समोर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या 11 सामन्यांमध्ये नाणेफेक गमावला आहे. गेल्या 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाने नाणेफेक गमावली आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला हा ट्रेंड मोडून कोणत्याही परिस्थितीत टॉस जिंकावा लागेल. टीम इंडियाने नाणेफेक हारुनही विजय मिळवले असले तरी अंतिम सामन्यात टॉस महत्त्वाचा आहे.

दुबईची खेळपट्टी गोलंदाजांसाठी चांगली आहे तर इथे फलंदाजांची कसोटी लागेल. कारण पहिल्या डावात संघाने 290-300 पर्यंत धावा केल्या तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघासमोर मोठे आव्हान उभे राहील. त्यामुळेच आज नाणेफेक महत्त्वाची आहे.  2013 च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रोहितने नाणेफेक गमावली होती आणि ऑस्ट्रेलियन संघाने तो सामना जिंकला होता.

ट्रेंडिंग बातमी - Pune News: श्रीमंतीचा माज, भरचौकात नंगानाच... BMW मधून उतरला अन्.. पुण्यातील घटनेने संताप