मुंबई इंडियन्स सोडलं तर रोहित शर्मा कोणत्या संघातून खेळू शकतो? या 2 संघांची नावे आघाडीवर

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं नाहीतर 2025 च्या आयपीएलसाठी तो पंजाब किंग्स किंवा लखनऊ सुपर जायंट्स संघांमध्ये सामील होऊ शकतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सची स्थिती अत्यंत खराब आहे. मुंबईच्या खराब कामगिरीचं प्रमुख कारण संघातील अंतर्गत मतभेद असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. यंदाचा सीजन सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने मोठा निर्णय घेतला होता. मागील अनेक वर्षांपासून कर्णधार असलेल्या रोहित शर्माला हटवून कर्णधारपदाची जबाबादारी हार्दिक पंड्यावर सोपवली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र हार्दिकला कर्णधार बनवणे अनेक वरिष्ठ खेळाडूंना पटलं नाही. अनेक माजी खेळाडू देखील मुंबई इंडियन्सच्या या निर्णयाने चकीत झाले. रोहित शर्मा देखील कर्णधार पदावरुन हटवल्यानंतर नाराज असल्याची चर्चा आहे. रोहित आणि मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटमध्ये देखील काही मतभेत असल्याची माहिती समोर येत आहे. 

नक्की वाचा - RCB ला प्ले ऑफ गाठण्यासाठी CSK नाही तर 'हा' आहे अडथळा

या सर्व पार्श्वभूमीवर पुढच्या वर्षी होणाऱ्या लिलावात मुंबई इंडियन्स संघात अनेक उलटफेर होऊ शकतात. मागच्या वेळी असलेला नियम कायम राहिल्यास सर्व संघ आपले तीन खेळाडू रिटेन करतील. त्यामुळे मुंबई इंडियन्स फ्रॅन्चायजी हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह आणि सूर्यकुमार यादव यांना रिटेन करु शकतात. 

रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने रिटेन केलं नाहीतर 2025 च्या आयपीएलसाठी तो पंजाब किंग्स किंवा लखनऊ सुपर जायंट्स संघांमध्ये सामील होऊ शकतो. आयपीएल 2024 च्या सुरुवातीला पंजाब संघाचं नेतृत्व शिखर धवनकडे होते. मात्र संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. त्यानंतर सॅम करनने कर्णधार पदाची धुरा सांभाळली.

Advertisement

( नक्की वाचा : विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही? )

मात्र तरीही संघाच्या कामगिरीत फार सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं नाही. पंजाब संघात नेहमीच चांगले खेळाडूंचा समावेश असतो. मात्र संघाच्या नेतृत्वाच कमी जाणवते. त्यामुळे फ्रॅन्चायची रोहित शर्माला आपल्यासोबत जोडण्यासाठी प्रयत्न करु शकते.   

लखनऊ संघाची स्थिती देखील अशीच आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार केएल राहुल यांच्यात वाद झाल्याची देखील चर्चा आहे. संघाच्या खराब कामगिरीवरुन गोयंका राहुलवर नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे रोहित पुढच्या सीजनमध्ये लखनऊ संघासोबत जोडला जाऊ शकतो, अशी देखील शक्यता आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article