IND vs AFG: भयंकर अन्याय! सेंच्युरी करूनही जागा मिळेना...गिल आणि गंभीर दिग्गज मुंबईकरला कधी देणार न्याय?

India vs Afghanistan: शुबमन गिल आणि गौतम गंभीर दिग्गज मुंबईकरावरील अन्याय कधी दूर करणार हा प्रश्न आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
IND vs AFG : भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात वन-डे सीरिज सुरु झाली आहे.
मुंबई:

India vs Afghanistan: भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात धरमशालामध्ये सुरु असलेला पहिला वन-डे सामना पावसामुळे 25-25 ओव्हर्सचाच खेळवला जात आहे. पावसामुळे या सामन्याचा दोन तासांपेक्षा खेळ वाया गेला. टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिलनं या मॅचमध्ये टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. या सीरिजमध्ये विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज हे सिनिअर खेळाडू दुखापतग्रस्त आहेत, अनुपलब्ध आहेत किंवा त्यांना विश्रांती देण्यात आली.

चार प्रमुख खेळाडूंशिवाय मैदानात उतरलेल्या भारतीय टीममध्ये दोन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. हर्ष दुबे आणि गुरनूर ब्रार यांनी या मॅचमध्ये पदार्पण केलंय. पण, त्यानंतरही भारतीय टीमच्या प्लेईंगबाबत AI नं फॅन्सनं आश्चर्य आणि निराशा व्यक्त केलीय. 

Advertisement

अनुभवी मुंबईकरवर पुन्हा अन्याय

टीम इंडियात सिनिअर खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये विशेषत: विराट कोहली नसल्यानं मुंबईकर यशस्वी जयस्वालला संधी मिळेल असं मानलं जात होतं.पण, टीम मॅनेजमेंटनं त्याला पुन्हा एकदा डावललं आहे.

टेस्ट क्रिकेट तसंच आयपीएलमध्ये आपला ठसा उमटवलेल्या यशस्वीमध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारात खोऱ्यानं रन्स करण्याची आणि स्वत:चा ठसा उमटवण्याची संधी आहे. त्यानंतरही त्याचा वन-डे आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात विचार होत नाही. भारतीय टीममध्ये प्रत्येक जागेसाठी मोठी स्पर्धा आहे. पण, विराट कोहलीसारखा टॉप ऑर्डर बॅटर खेळत नसूनही यशस्वीला धरमशालामध्ये अफगाणिस्तानविरुद्ध संधी मिळाली नाही. त्यामुळे फॅन्सनमध्ये निराशाचे वातावरण आहे.

( नक्की वाचा : फुटबॉल प्रेमींसाठी गूड न्यूज! 1 रुपयाही खर्च न करता मोबाईल, टीव्हीवर फ्री दिसणार FIFA World Cup 2026 चे सामने )

कशी आहे यशस्वीची कारकीर्द?

यशस्वीच्या खेळासाठी वन-डे फॉर्मेट हा अगदी योग्य मानला जातो. त्यानं आजवर मिळालेल्या अगदी मर्यादीत संधीत ते दाखवून दिलंय. विशेषत: तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटची वन-डे खेळला होता त्यावेळी त्यानं सेंच्युरी झळकावली होती. 6 डिसेंबर 2025 रोजी विशाखापट्टणममध्ये झालेल्या वन-डे मॅचमध्ये त्यानं नाबाद 116 रन्सची खेळी करत टीम इंडियाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं होतं. पण, या सेंच्युरीनंतर त्याला एकदाही वन-डे मॅचमध्ये संधी मिळालेली नाही.

पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 मध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्ड कपची तयारी टीम इंडियानं सुरु केली आहे. आता वन-डे सामने फार होत नसल्यानं या वर्ल्ड कपपूर्वी होणारा प्रत्येक एकदिवसीय सामना महत्त्वाचा आहे. पण, प्रमुख खेळाडूच्या अनुपस्थितही यशस्वीला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळालेली नाही. त्य़ामुळे तो टीम मॅनेजमेंटच्या वर्ल्ड कप प्लॅनिंगमध्ये आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. कॅप्टन शुबमन गिल आणि हेड कोच गौतम गंभीर हे यशस्वीवरचा अन्याय कधी दूर करणार हा प्रश्न फॅन्स विचारत आहेत. 

Advertisement
Topics mentioned in this article