
India Vs Australia: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मधील पाचवा आणि शेवटचा सिडनीच्या मैदानावर पार पडला. येथे खेळली गेली. या सामन्यात कांगारू संघाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर 3-1 ने कब्जा केला आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025 च्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. टीम इंडियाच्या कसोटीमधील वर्चस्वासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
1. दिग्गज फलंदाजांचा फ्लॉप शो...
टीम इंडियाने केवळ सिडनीमधील सामन्यातच नव्हे तर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचही कसोटीत खराब फलंदाजीचे प्रदर्शन केले. सिडनी कसोटीत टीम इंडियाला दोन्ही डावात 200 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी 185/10 धावा फलकावर लावल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडिया अवघ्या 157/10 धावांवर बाद झाली. खराब फलंदाजीमुळे भारताने ऑस्ट्रेलियासमोर केवळ 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे त्यांनी केवळ 4 विकेट्स गमावून पूर्ण केले.
2. जसप्रीत बुमराह जखमी
सिडनी कसोटीत रोहित शर्माला वगळून जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्यात आले. सिडनी कसोटीत बुमराहला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात बुमराह पाठीच्या दुखण्यामुळे मैदानाबाहेर गेला होता. त्याने पहिल्या डावात फक्त 10 षटके टाकली. यानंतर बुमराहला गोलंदाजीसाठी मैदानात परतता आले नाही. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाला बुमराहची खूप उणीव भासली.
3. चुकीची संघ निवड
टीम इंडियाने सिडनी कसोटीसाठी चुकीचा संघ निवडला. जिथे ऑस्ट्रेलियाने फक्त एकच फिरकीपटू खेळवला, तिथे टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन फिरकीपटूंना संधी देण्यात आली. खेळपट्टीनुसार संघात चार वेगवान गोलंदाजांची जागा होती, पण टीम इंडिया फक्त तीन प्रमुख वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली. सिडनी कसोटीत भारताने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला रवींद्र जडेजाला फिरकीची संधी दिली. या सामन्यात चार वेगवान गोलंदाज असते तर बुमराहवर फारसा भार पडला नसता आणि तो दुखापत टाळू शकला असता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world