Ravindra Jadeja Tape Controversy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची पहिली सेमी फायनल सुरु आहे. ही सेमी फायनल जिंकण्यासाठी टीम इंडियासमोर 265 रन्सचं आव्हान आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी उतरलेली ऑस्ट्रेलियन टीम 49.3 ओव्हर्समध्ये 264 रन्सवर ऑल आऊट झाली.
भारताची बॉलिंग सुरु असताना प्रमुख ऑल राऊंडर रविंद्र जडेजाला हातावरील पट्टी काढण्याची सूचना अंपायरनं केली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. तुम्हाला याचं कारण आम्ही सांगणार आहोत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
ऑस्ट्रेलियाच्या इनिंगमधील 19 व्या ओव्हरमध्ये रविंद्र जडेजा बॉलिंग करण्यासाठी आला होता. त्यावेळी अंपायर रिचर्ड इलिंगवर्थनं त्याला अडवलं आणि हातावरील पट्टी काढण्याची सूचना केली. हाताला दुखापत झाली असल्यानं ही पट्टी बांधल्याचं जडेजानं अंपायरला समाजवलं. पण, त्यानंतरही अंपायर इलिंगवर्थ त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी जडेजाला हातावरील पट्टी हटवण्यास सांगितले.
अंपायरनं जडेजाला हातावरील पट्टी काढण्यास सांगितलं, त्यावेळी कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनीही अंपायरची त्या विषयावर चर्चा केली.
जडेजानं त्याच्या डाव्या हाताच्या पट्टी बांधली होती. ICC च्या नियमानुसार कोणताही बॉलर तो ज्या हातानं बॉलिंग टाकतो. त्याला त्या हातावर कोणतीही पट्टी बांधता येत नाही. नियम 28.1 नुसार हातांच्या बोटांना सुरक्षेसाठी फक्त अंपायर्सच्या परवानगीनंतरच टेप / पट्टी बांधता येते.
( नक्की वाचा : IND vs AUS : भारत जिंकला तर पाकिस्तानला होणार सर्वात जास्त त्रास, लाहोरचं मैदान राहणार रिकामं! )
जडेजाची जिगरबाज बॉलिंग
जडेजानं हाताला त्रास होत असूनही जिगरबाज बॉलिंग केली. त्यानं 23 व्या ओव्हरमध्ये चिवट बॅटिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या मार्नस लाबूशेनला LBW केलं. लाबूशेननं 29 रन्स केले. त्यानंतर 27 व्या ओव्हरमध्ये जोश इंग्लिसला 11 रनवर आऊट केलं. इंग्लिसनं या स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध सेंच्युरी झळकावली होती.
जडेजानं 8 ओव्हर्समध्ये 40 रन्स देत 2 विकेट्स घेतल्या. हातामध्ये रक्त येत असूनही त्यानं केलेल्या बॉलिंगबद्दल जडेजाचं कौतुक होत आहे.