जाहिरात

IND vs AUS : टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात जास्त त्रास, लाहोरचं मैदान राहणार रिकामं

IND vs AUS, Champions Trophy Semi Final: भारतानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला तर त्याचा सर्वात जास्त त्रास पाकिस्तानला होणार आहे.

IND vs AUS : टीम इंडियाच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात जास्त त्रास, लाहोरचं मैदान राहणार रिकामं
India vs Australia : टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आत्तापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. (फोटो - AFP)
मुंबई:

IND vs AUS, Champions Trophy Semi Final:  टीम इंडियानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दुबईत झालेल्या पहिल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं पराभव केला. ऑस्ट्रेलियानं दिलेलं 265 रन्सचं आव्हान भारतानं विराट कोहलीच्या हाफ सेंच्युरीच्या जोरावर 5 विकेट्स राखून पूर्ण केलं. 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आजवरच्या इतिहासात भारतीय टीमनं दोनवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. टीम इंडियानं 2002 आणि 2013 साली या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. 2022 साली भारत आणि श्रीलंका संयुक्त विजेते होते. तर 2013 साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखालील टीमनं इंग्लंडचा पराभव करत विजेतेपद पटकावलं होतं. आता टीम इंडिया विजेतेपदापासून फक्त दोन पावलं दूर आहे. यंदा चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दुबई आणि पाकिस्तानमध्ये होत आहे. पाकिस्तानसाठी नामुश्कीची बाब म्हणजे त्यांची टीम यजमान असूनही सेमी फायनलपर्यंत पोहचू शकलेली नाही.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारताच्या विजयाचा पाकिस्तानला धक्का

आता भारतीय टीम सेमी फायनलमध्ये आहे. टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा सेमी फायनलमध्ये पराभव केल्याचा सर्वात मोठा धक्का पाकिस्तानला बसला. कारण,  भारतीय टीम फायनलमध्ये गेल्यानं फायनलचं ठिकाण बदलण्यात येणार आहे. आता फायनल लाहोरला न होता दुबईमध्ये होईल. त्याचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (PCB) महसूलावर मोठा परिणाम होईल. 

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले. त्यासाठी जवळपास 561 पाकिस्तानी कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या स्पर्धेत एकिकडं पावसामुळे सामने पूर्ण झाले नाहीत. त्याचवेळी भारतीय टीम फायनलमध्ये पोहोचली तर मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. 

( नक्की वाचा : IND vs PAK : विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या बॅटिंगचं काय आहे रजनीकांत कनेक्शन? पाहा Video )
 

त्याचबरोबर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा फटका त्यांच्या टीमच्या कामगिरीमुळे झाला. पाकिस्तान टीमनं ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या दोन मॅचमध्ये पराभूत झाली. तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला. टीमच्या खराब कामगिरीमुळे फॅन्सला मोठी निराशा सहन करावी लागली आहे. यजमान टीम त्यांच्या देशात सेमी फायनल आणि फायनल खेळू शकली नाही. भारताकडूनही पराभूत झाली हे दु:ख त्यांच्यासाठी मोठं आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: