Ind Vs Aus: रोहित, विराटचा फ्लॉप शो, टीम इंडिया पराभवाच्या छायेत; पहिल्याच सत्रात 3 धक्के

चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावून 228 धावा केल्या होत्या. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाला फक्त  फक्त 6 धावा जोडता आल्या.

जाहिरात
Read Time: 2 mins

India Vs Australia test:  ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या मेलबर्न कसोटीत भारतीय संघाला 340 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 9 गडी गमावून 228 धावा केल्या होत्या. आज सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या संघाला फक्त  फक्त 6 धावा जोडता आल्या. दुसरीकडे भारतीय संघाचीही सुरुवात खराब झाली असून अवघ्या 33 धावांमध्ये तीन बळी गमावलेत. 

कांगारू संघाने पहिल्या डावात 105 धावांची आघाडी घेतल्याने चौथ्या दिवसअखेर संघाची एकूण आघाडी 333 धावांची होती. पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाला आपल्या डावात आणखी फक्त 6 धावा जोडता आल्या, त्यामुळे त्यांचा दुसरा डाव 234 धावांत आटोपला. आता टीम इंडियाला मेलबर्न कसोटी जिंकण्यासाठी एकूण 340 धावा कराव्या लागणार आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पाचव्या दिवशी भारतीय संघाची सुरुवातही खराब झाली. टीम इंडियाने पहिल्याच सत्रात 3 गडी गमावून 33 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली पहिल्या सत्रात बाद झाले. यशस्वी जैस्वाल सध्या 83 चेंडूत 14 धावा करून खेळत आहे. अजून ६५ षटकांचा खेळ बाकी आहे, ज्यामध्ये टीम इंडियाला विजयासाठी ३०७ धावा करायच्या आहेत.

मेलबर्न कसोटीत, खराब प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला, तर खराब हवामानामुळे अनेक षटकेही खेळता आली नाहीत. तिसऱ्या दिवशी झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी पाचव्या दिवशी षटकांची संख्या 98 करण्यात आली. पण आता टीम इंडियाकडे 340 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी 92 षटके म्हणजेच 552 चेंडू शिल्लक आहेत.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Crime news: 27 वर्षाची शिक्षिका, तो 17 वर्षाचा, तिनं त्याला उत्तेजीत केलं अन् स्टाफरूममध्येच...

पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार?

2020-21 मध्ये जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला तेव्हा टीम इंडियाला ब्रिस्बेन कसोटीत 328 धावांचे लक्ष्य मिळाले होते. आता 2024 च्या मेलबर्न कसोटीतही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या सामन्यात शुभमन गिल खेळत होता, त्याने पहिल्या डावात ९१ धावा केल्या होत्या पण मेलबर्न कसोटीसाठी गिलला वगळण्यात आले. पण त्या सामन्याचा सर्वात मोठा हिरो होता ऋषभ पंत, ज्याची ८९ धावांची खेळी चाहत्यांच्या मनात अजूनही ताजी असेल.

Topics mentioned in this article