IND vs BAN : 'मला का मारतोय' ऋषभ पंत - लिटन दास भर मैदानात भिडले, पाहा Video

India vs Bangladesh 1st Test : ऋषभ पंत आणि लिटन दास भर मैदानात एकमेकांशी वाद घालत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील पहिल्या टेस्टला चेन्नईत सुरुवात झाली. या टेस्टमध्ये टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. कॅप्टन रोहित शर्मा, शुबमन गिल आणि विराट कोहली झटपट आऊट झाले. तीन विकेट्स झटपट गेल्यानं भारताची अवस्था 3 आऊट 34 झाली होती. त्यावेळी यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत या जोडीनं भारताची इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. 

634 दिवसानंतर टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतनं यशस्वीच्या मदतीनं सावध बॅटिंग केली. या दोघांनी पहिल्या सेशनमध्ये आणखी पडझट होऊ दिली नाही. पण खेळाच्या पहिल्याच तासात घडलेल्या एका घटनेनं क्रिकेट फॅन्सना धक्का बसला. भर मैदानात ऋषभ पंत आणि लिटन दास एकमेकांशी वाद घालत होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेमकं काय घडलं?

भारताच्या इनिंगमधील 16 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. बांगलादेशचा फास्ट बॉलर तस्किन अहमद ही ओव्हर टाकत होता. या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर पंत आणि यशस्वीनं एक रन काढला. त्यावेळी बांगलादेशच्या फिल्डरनं टाकलेला बॉल पंतच्या पॅडला लागला आणि त्याची दिशा बदलली. त्यानंतर लगेच पंत दुसरा रन काढण्याच्या प्रयत्नात होता.

( नक्की वाचा : रिकी पॉन्टिंगनं दिला सर्वांनाच धक्का, 'या' आयपीएल टीमचा झाला मुख्य प्रशिक्षक )
 

बांगलादेशचा विकेट किपर लिटन दासला पंतचा हा प्रकार आवडला नाही. त्यानं पंतवर रागानं नाराजी व्यक्त केली. पंतनंही त्याला उत्तर दिलं. दोघं एकमेकांच्या समोर येऊन वाद घालत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याच्यामध्ये 'त्याच्याकडं फेक ना. भाई, मला का मारत आहेस?', असं पंत दासला म्हणत असल्याचं ऐकू येतं आहे. 

भारताची इनिंग पुन्हा गडगडली

चेन्नई टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतीय बॅटर्सनी निराशा केली.  रोहित, गिल आणि विराट हे टॉप ऑर्डरमधील तीन बॅटर पहिल्या तासातच झटपट परतले. यशस्वी - पंत जोडीनं चौथ्या विकेटसाठी 62 रनची पार्टनरशिप करत ही पडझड थांबवण्याचा प्रयत्न केला. पण, ऋषभ पंत 39 रनवर आऊट होताच भारतीय इनिंगची पडझड झाली.

यशस्वी जैस्वालनं हाफ सेंच्युरी पूर्ण केली. पण, त्यानंतर तो लगेच 56 रनवर आऊट झाला. अनुभवी केएल राहुलनंही निराशा केली. राहुलला 14 रनच करता आले. टीम इंडियानं 6 विकेट्स 150 च्या आत गमावल्या.

Topics mentioned in this article