ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू आणि वर्ल्ड कप विजेत्या टीमचा कॅप्टन रिकी पॉन्टिंगची (Ricky Ponting) पंजाब किंग्जच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. आजवर एकदाही आयपीएल ट्रॉफी न जिंकणाऱ्या पंजाबच्या टीमचा कायपालाट करण्याचं मोठं आव्हान पॉन्टिंगसमोर आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रिकी पॉन्टिंग यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक होता. त्याचा सात वर्षांचा करार संपला आहे. त्यानंतर पॉन्टिंगला पंजाब किंग्जला करारबद्ध केलं आहे. पॉन्टिंगचा पंजाबसोबतचा करार चार वर्षांचा असेल. या कालावधीमध्ये त्याला टीम तयार करण्यासाठी पूर्ण वेळ मिळेल. पंजाबच्या सपोर्ट स्टाफमधील अन्य व्यक्तींची निवडही पॉन्टिंग करणार आहे, अशी माहिती पीटीआयला सूत्रांनी दिली आहे.
𝐏𝐔𝐍TER is 𝐏𝐔𝐍JAB! 🦁♥️
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) September 18, 2024
🚨 Official Statement 🚨
Ricky Ponting joins Punjab Kings as the new Head Coach! #RickyPonting #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/DS9iAHDAu7
रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्सला कधीही आयपीएल विजेतेपद मिळवता आलं नाही. पण दिल्लीची एक मजबूत टीम घडवण्यात पॉन्टिंगचं योगदान होतं. पॉन्टिंगच्याच मार्गदर्शनाखाली दिल्लीनं आयपीएल 2020 मधील फायनलमध्ये प्रवेश केला होता. मुंबई इंडियन्सचा प्रशिक्षक म्हणूनही त्यानं काम केलं आहे.
( नक्की वाचा : 'त्यांना मजा करु दे...' रोहितनं पहिल्या टेस्टपूर्वी संपवला बांगलादेशाचा विषय )
पंजाब किंग्जकडं आयपीएल 2024 मध्ये अर्शदीप सिंग, जितेश शर्मा, कागिसो रबाडा, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन आणि जॉनी बेअरस्टो असे दिग्गज खेळाडू होते. त्यानंतरही त्यांना प्ले ऑफ गाठण्यात अपयश आलं. शशांक सिंह आणि आशुतोष शर्मा या दोन नवोदित खेळाडूंची (Uncapped) कामगिरी हीच पंजाब किंग्जच्या निराशाजनक सिझनमधील दिलासादायक गोष्ट होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world