विराट कोहलीवर 11 वर्षांनी आली 'ती' वेळ, कुणीही केली नव्हती कल्पना

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील कानपूर टेस्टमध्ये विराट कोहलीवर (Virat Kohli) जी वेळ आली त्याचा कुणीही विचार केला नव्हता.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात कानपूरमध्ये सुरु असलेल्या टेस्टच्या चौथ्या दिवसाच्या अखेर टीम इंडिया भक्कम स्थितीमध्ये आहे. या टेस्टमध्ये दोन दिवसांच्या व्यत्ययानंतर चौथ्या दिवशी खेळ झाला. बांगलादेशची पहिली इनिंग 233 रनवर संपुष्टात आली. टीम इंडियानं 233 रनचा पाठलाग करताना T20 स्टाईलनं बॅटिंग केली.

भारतानं पहिली इनिंग 9 आऊट 285 वर घोषित केली. भारताकडून यशस्वी जैस्वालनं सर्वाधिक 72 रन काढले. तर केएल राहुलनं 68 रन केले. रोहित शर्मा (23), शुबमन गिल (39) आणि विराट कोहली (47) यांनी उपयुक्त खेळी करत टीम इंडियाचा स्कोअर वाढवला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विराटवर 11 वर्षांनंतर आली वेळ

टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी 3 ओव्हरमध्ये 50 रन पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड केला. रोहित आऊट झाल्यानंतर शुबनन गिल मैदानात उतरला. गिल आणि यशस्वी जोडीही आक्रमक खेळत होती. यशस्वीला हसन महमूदनं 72 रनवर आऊट केल. त्यानंतर बॅटिंग ऑर्डरमधील सामान्य क्रमानुसार विराट कोहली येणे अपेक्षित होते. पण, तसं झालं नाही. ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला. 


शुबमन गिल आऊट झाल्यानंतर विराट कोहली पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी उतरला. हे सर्वांसाठीच अनपेक्षित होतं. 2013 नंतर पहिल्यांदाच कोणत्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये नाईट वॉचमन न येता विराट कोहलीला 4 नाही तर 5 नंबरवर खेळण्याची ही पहिलीच वेळ होती. 

Advertisement

चौथ्या क्रमांकावर प्रमोशन मिळालेला ऋषभ पंत यशस्वी ठरला नाही. तो 11 बॉलमध्ये 9 रन काढून आऊट झाला. पाचव्या क्रमांकावर आलेल्या विराटनं 35 बॉलमध्ये 47 रन काढले.

( नक्की वाचा : IND vs BAN : 147 वर्षांमध्ये कुणालाही जमलं नाही ते रोहित-यशस्वीनं केलं! )

बांगलादेश बॅकफुटवर

भारतानं पहिल्या इनिंगमध्ये 62 रनची आघाडी घेतली. बांगलादेशची दुसऱ्या इनिंगमध्ये सुरुवात खराब झाली. चौथ्या दिवसाच्या अखेरीस बांगलादेशची अवस्था 2 आऊट 26 अशी झाली आहे. बांगलादेश अजूनही 26 रननी पिछाडीवर आहे. आता मंगळवारी शेवटच्या दिवशी बांगलादेशच्या उर्वरित आठ विकेट्स झटपट घेऊन मॅच जिंकण्याचं लक्ष्य टीम इंडियासमोर आहे.

Advertisement
Topics mentioned in this article