Himanshu Singh : 21 वर्षांच्या मुंबईकरची का होतीय चर्चा? त्याचं अश्विनशी काय आहे साम्य?

India vs Bangladesh : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणाऱ्या पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Himanshu Singh
मुंबई:

भारत विरुद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यात होणाऱ्या पहिल्या टेस्टसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सीरिजमध्ये 2-0 असा विजय मिळवणाऱ्या बांगलादेशसोबत भारताची ही टेस्ट 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या टेस्टसाठी रोहित शर्मा, विराट कोहलीसह सर्व प्रमुख खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. प्रमुख खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या टेस्ट मॅचपूर्वी आजवर एकाही आंतरराष्ट्रीय मॅच न खेळलेल्या 21 वर्षांच्या मुंबईकरची चर्चा आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

भारतीय टीमचं वैशिष्ट्य

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी ऋषभ पंतनं टीम इंडियात पुनरागमन केलंय. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर पंतची पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये निवड करण्यात आली आहे. तर फास्ट बॉलर यश दयाल टीम इंडियामधील नवा चेहरा आहे. 19 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाचा ट्रेनिंग कँप आयोजित करण्यात आलाय. या कँपसाठी 21 वर्षांच्या हिंमाशू सिंहला आमंत्रण आलं आहे. तो या कॅपमध्ये भारतीय बॅटर्सना बॉलिंग करणार आहे.   

( नक्की वाचा : ब्रॅडमन, सचिनलाही जमलं नाही ते 'या' खेळाडूनं केलं, 147 वर्षांच्या इतिहासातील पहिली घटना )

कोण आहे हिमांशू सिंह?

चेन्नईमध्ये 12 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या टीम इंडियाच्या ट्रेनिंग कँपसाठी हिमांशू सिंहला बोलण्यात आल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. 21 वर्षांचा हिंमाशू मुंबईकडून क्रिकेट खेळतो. थिमपिया मेमोरियल स्पर्धेत आंध्र प्रदेश विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये 74 रन देत 7 विकेट्स घेतल्या. या कामगिरीमुळे निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकरचं लक्ष त्यानं वेधून घेतलं. 

Advertisement

हिमांशूची बॉलिंग अ‍ॅक्शन हे त्याच्या निवडीचं मुख्य कारण मानलं जात आहे. त्याची बॉलिंग अ‍ॅक्शन हे भारताचा महान ऑफ स्पिनर आर. अश्विनशी साधर्म्य असलेली आहे. हिमांशूला अद्याप सीनियर टीमकडून खेळण्याची संधी मिळालेली नाही. पण, तो मुंबईच्या अंडर 16 आणि अंडर 23 टीमचा सदस्य होता. त्याचबरोबर काही वर्षांपूर्वी बीसीसीआयनं अनंतपूर आणि बंगळुरुमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'इमर्जिंग प्लेयर' शिबिरामध्येही तो सहभागी झाला होता.