IND vs ENG 3rd Test : लॉर्ड्सवर खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात भारतासाठी दमदार झाली आहे. याचे श्रेय तरुण वेगवान गोलंदाज नितीश रेड्डीला जाते. ज्याने त्याच्या पहिल्याच षटकात दोन महत्त्वाचे विकेट घेत इंग्लंडला सुरुवातीलाच धक्का दिला. रेड्डीने त्याच्या पहिल्याच षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर बेन डकेटला विकेटमागे झेलबाद केले. चेंडू खेळपट्टीवर उसळल्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेर जात होता, ज्यावर डकेटने त्याची बॅट स्विंग केली. परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या मागच्या बाजूला जाऊन विकेटकीपर ऋषभ पंतच्या ग्लोव्हजमध्ये गेला.
त्यानंतर दोन चेंडूंनंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रेड्डीने झॅक क्रॉलीलाही बाद केले. क्रॉली चांगल्या लयीत दिसत होता आणि त्याने 18 धावा केल्या होत्या. परंतु रेड्डीच्या उत्कृष्ट सीम पोझिशन आणि अतिरिक्त बाउन्समुळे तो चकीत झाला. चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि पुन्हा एकदा पंतच्या हातात गेला आणि इंग्लंडने त्यांची दुसरी विकेटही गमावली.
(नक्की वाचा- Shubhman Gill: एक सामना अन् 5 महारेकॉर्ड मोडण्याची संधी! कर्णधार शुभमन गिल रचणार नवा इतिहास)
युवा वेगवान गोलंदाज नितीश रेड्डीने लॉर्ड्स कसोटीत एक विशेष कामगिरी केली आहे. 2002 नंतर कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात दोन बळी घेणारा तो दुसरा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, 2006 मध्ये कराची कसोटीच्या पहिल्याच षटकात पाकिस्तानविरुद्ध हॅटट्रिक घेऊन इतिहास रचताना इरफान पठाणने ही कामगिरी केली होती. आता बरोबर 18 वर्षांनंतर 2025 मध्ये, नितीश रेड्डीने लॉर्ड्सच्या मैदानावर ही विस्मरणीय कामगिरी पुन्हा केली आहे.
(IND vs ENG: लॉर्ड्स टेस्टमध्ये इतिहास घडणार! 4 भारतीय खेळाडूंची महारेकॉर्डवर नजर)
पहिल्या दिवसाचा खेळ
पहिल्या दिवशी इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूट त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 37 वे शतक ठोकण्यापासून फक्त एक धाव दूर आहे. रूटच्या शानदार फलंदाजीच्या मदतीने इंग्लंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत पहिल्या डावात चार विकेट गमावून 251 धावा केल्या आहेत. खेळ थांबला तेव्हा रूट 191 चेंडूत 9 चौकारांसह 99 धावा आणि कर्णधार बेन स्टोक्स 39 धावांवर खेळत आहे. आतापर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये 79 धावांची भागीदारी झाली आहे.