India vs England 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील लीड्समध्ये झालेली पहिली टेस्ट यजमान टीमनं 5 विकेट्सनं जिंकली आहे. पाचव्या दिवशी इंग्लंडसमोर 371 रन्सचंं टार्गेट होतं. पाचव्या दिवसाच्या पिचचा विचार करता हे टार्गेट आव्हानात्मक होते. पण, भारतीय बॉलर्सनी साफ निराशा केली. या पराभावामुळे टीम इंडिया पाच टेस्टच्या सीरिजमध्ये 0-1 नं पिछाडीवर पडली आहे.
इंग्लंकडून बेन डकेट आणि झॅक क्रॉली यांनी विजयाचा पाया रचला. डेकटनं सेंच्युरी झळकावत 170 बॉल्समध्ये 149 रन्स केले. त्यानं क्रॉलीसोबत पहिल्या विकेटसाठी 188 रन्सची पार्टनरशिप केली. क्रॉली 65 रन्स काढून आऊट झाला.
टीम इंडियानं दुसऱ्या सेशनमध्ये विकेट्स घेत मॅचमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. पण, अनुभवी जो रुटनं सामना इंग्लंडच्या हातातून निसटणार नाही, याची खबरदारी घेतली.
टीम इंडियाकडून या मॅचमध्ये एकूण पाच सेंच्युरी झळकावण्यात आले. ऋषभ पंतनं तर दोन्ही इनिंगमध्ये सेंच्युरी करण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. पण, त्यांच्या या कामगिरीवर बॉलर्सच्या सुमार कामगिरीनं पाणी ओतलं.
टीम इंडियाचा सर्वात प्रमुख बॉलर जसप्रीत बुमराहला दुसऱ्या इनिंगमध्ये एकही विकेट मिळाली नाही. टीम इंडियाच्या पराभवाचं हे देखील एक मुख्य कारण ठरलं.