जाहिरात

फक्त 438 रुपयांमध्ये मिळतंय T20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट,'या' पद्धतीनं करा घरबसल्या बुक

IND vs PAK Ticket Price : भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या प्रत्येक क्रिकेट सामन्याची उत्सुकता जगभर असते. या दोन टीमची पुढील लढत 2026 मध्ये होणाऱ्या आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कपमध्ये होणार आहे.  

फक्त 438 रुपयांमध्ये मिळतंय T20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट,'या' पद्धतीनं करा घरबसल्या बुक
IND vs PAK Ticket Price : आयसीसीच्या स्पर्धेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात कमी तिकीट किंमत असल्याचं मानलं जात आहे.
मुंबई:

IND vs PAK Ticket Price : भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या प्रत्येक क्रिकेट सामन्याची उत्सुकता जगभर असते. या दोन टीमची पुढील लढत 2026 मध्ये होणाऱ्या आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कपमध्ये होणार आहे.  11 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 6:45 वाजल्यापासून या स्पर्धेच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे, भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या या स्पर्धेत चाहत्यांना अत्यंत कमी किमतीत तिकीट उपलब्ध करून दिले आहे.

फक्त 100 रुपयांत मॅच बघण्याची संधी

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात देशातील काही ठिकाणच्या सामन्यांसाठी तिकीटांची किंमत केवळ 100 रुपये ठेवली आहे. तर, श्रीलंकेत ही किंमत 1000 श्रीलंकन रुपये आहे. आयसीसीच्या स्पर्धेच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात कमी तिकीट किंमत असल्याचं मानलं जात आहे.

भारत-पाकिस्तान महामुकाबल्यासाठी तिकीटाचे दर काय आहेत?

क्रिकेट चाहत्यांची नजर अर्थातच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबल्याच्या तिकीट दरांवर आहे.दोन्ही देशांमधील लीग टप्प्यातील हाय-व्होल्टेज सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाईल.

( नक्की वाचा : IPL 2026 Auction : जडेजाला रिलीज केल्यानंतर CSK ची मोठी चाल; 'या' 5 तगड्या खेळाडूंना करणार लिलावात टार्गेट )

या मॅचसाठी आयसीसीने तिकीटाची सुरुवातीची किंमत केवळ 438 रुपये (1500 श्रीलंकन रुपये) इतकी ठेवली आहे. याचच अर्थ फक्त 438 रुपयांमध्ये  तुम्ही दोन्ही टीमचा खेळ जवळून बघू शकता.

घरबसल्या टी20 वर्ल्ड कप 2026 च्या तिकिटांची बुकिंग कशी करणार?

टी20 वर्ल्ड कप 2026 चे तिकीट बुक माय शो (Book My Show) ॲपद्वारे घरबसल्या सहज बुक करता येतील. तिकीट बुक करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे:

1. तुमचे 'बुक माय शो' ॲपवर खाते असेल, तर लॉग इन करा. खाते नसेल, तर नवीन खाते तयार करून ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन पूर्ण करा.
2.  ॲप उघडल्यानंतर वर्ल्ड कप (World Cup) टॅबवर क्लिक करा.
3.  आता ज्या ठिकाणी तुला मॅच बघायची आहे, त्या स्थानाची निवड करा.
4.  भारतीय संघाचा सामना बघायचा असेल, तर पेजवर थांबून राहा आणि तिकीट लाईव्ह होईपर्यंत पेज रिफ्रेश करू नका.
5.  पेज उघडताच तुला हव्या असलेल्या सीटची निवड करा आणि बुकिंग प्रक्रिया पूर्ण करा.
6.  सीट निवडल्यानंतर तुला M-तिकीट (M-Ticket) मिळेल, ज्यात सुरक्षेच्या कारणास्तव क्यूआर कोड (QR Code) काहीसा अस्पष्ट दिसेल. हा कोड मॅचच्या दिवशी किंवा त्यापूर्वी काही वेळात आपोआप ॲक्टिव्हेट होईल.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com