India's Squad For Asia Cup 2025: आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड जाहीर झाली आहे. 9 सप्टेंबरपासून ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. यंदा ही स्पर्धा T20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या T20 टीमचा कॅप्टन सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करेल. निवड समितीनं मुंबईमध्ये टीमची निवड जाहीर केली.या टीममध्ये T20 स्पेशालिस्ट खेळाडूंच समावेश आहे.
टीम इंडियाचा टेस्ट कॅप्टन शुबमन गिलची या स्पर्धेसाठी निवड होणार नाही, असं मानलं जात होतं. पण, 'NDTV मराठी'नं यापूर्वीच दिलेल्या वृत्तानुसार गिल या टीमचा व्हाईस कॅप्टन असेल. गिलसोबतच अनुभवी फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहचा देखील टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.
संजू सॅमसन टीममधील पहिल्या क्रमांकाचा विकेट किपर असून अतिरिक्त विकेट किपर महणून आयपीएल 2025 गाजवलेल्या जितेश शर्माची निवड करण्यात आली आहे. टीम इंडियाचा टेस्टमधील प्रमुख विकेट किपर ऋषभ पंत जखमी असल्यानं त्याचा विचार झालेला नाही.
( नक्की वाचा : 'विराट, रोहितनं अंतर्गत राजकारणामुळेच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली', माजी भारतीय खेळाडूचा BCCI वर आरोप )
त्याचप्रमाणे इंग्लंड दौरा गाजवलेले ओपनर्स यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांची T20 टीममध्ये निवड झालेली नाही. तर सध्या फॉर्मात असलेला मुंबईकर श्रेयस अय्यरला पुन्हा एकदा निराशा सहन करावी लागली आहे.
आशिया कप 2025 साठी भारतीय टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), शुबमन गिल (व्हाईस कॅप्टन), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेट किपर), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा आणि रिंकू सिंह