जाहिरात

'विराट, रोहितनं अंतर्गत राजकारणामुळेच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली', माजी भारतीय खेळाडूचा BCCI वर आरोप

Virat Kohli, Rohit Sharma Test Retirement : विराट कोहली आणि रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं सर्वांनाच धक्का बसला होता. 

'विराट, रोहितनं अंतर्गत राजकारणामुळेच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली',  माजी भारतीय खेळाडूचा BCCI वर आरोप
Virat Kohli, Rohit Sharma : विराट आणि रोहितबाबत माजी भारतीय खेळाडूनं मोठा दावा केला आहे.
मुंबई:

Virat Kohli, Rohit Sharma Test Retirement : विराट कोहली आणि रोहित शर्मानं टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानं सर्वांनाच धक्का बसला होता.  मे 2025 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी काही दिवसांवर असतानाच या दोन महान खेळाडूंनी त्यांच्या टेस्ट करियरला अचानक पूर्णविराम दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये खराब कामगिरीमुळे त्यांनी हा निर्णय घेतला, अशा अनेक बातम्या आणि तर्क होते, पण आता भारताचे माजी क्रिकेटपटू करसन घावरी यांनी या वादाला एक वेगळीच दिशा दिली आहे.

घावरी म्हणाले की, रोहित आणि कोहली या दोघांनाही टेस्ट क्रिकेट खेळायचे होते, पण बीसीसीआयमधील "अंतर्गत राजकारणामुळे" त्यांना निवृत्ती घेण्यास भाग पाडले.

( नक्की वाचा : Mohammed Shami : 'स्त्रीलंपट, रखेलच्या मुलीवर...' मोहम्मद शमीवर माजी पत्नीचे खळबळजनक आरोप )
 

काय केला आरोप?

"त्याने (विराट कोहली ) सहजपणे भारतासाठी आणखी दोन वर्षे टेस्ट क्रिकेट खेळणे सुरू ठेवायला हवे होते. पण त्याला निवृत्त होण्यास खरंच काहीतरी कारणीभूत ठरले. आणि दुर्दैवाने, जेव्हा तो निवृत्त झाला, तेव्हा बीसीसीआयने त्याला निरोप समारंभही दिला नाही," असे घावरी 'विकी लालवाणी शो' मध्ये म्हणाले.

"अशा महान खेळाडूंना, ज्यांनी बीसीसीआय, भारतीय क्रिकेट आणि भारतीय चाहत्यांसाठी इतकी उत्कृष्ट सेवा केली आहे, त्यांना एक भव्य आणि शानदार निरोप समारंभ दिला जायला हवा," अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.  रोहित आणि विराटच्या टेस्ट क्रिकेटमधून "वेळेआधी" घेतलेल्या निवृत्तीसाठी निवड समिती जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.

"हे बीसीसीआयमधील अंतर्गत राजकारण आहे, जे समजणे कठीण आहे. आणि मला वाटते की हेच त्याच्या अकाली निवृत्तीचे कारण आहे. रोहित शर्मानेही वेळेआधीच निवृत्ती घेतली. त्यांना बाहेर जाण्यास सांगितले गेले," असे घावरी म्हणाले.

( नक्की वाचा : India's Squad For Asia Cup: यशस्वी जैस्वालसह 3 मोठ्या स्टार्सना मिळणार नाही जागा! वाचा कशी असेल टीम? )
 

"असे नाही की त्यांना जायचे होते. त्यांना खेळणे सुरू ठेवायचे होते. पण निवड समिती आणि बीसीसीआयच्या कल्पना वेगळ्या होत्या. ही काहीतरी क्षुल्लक राजकारणाची बाब होती," असेही ते म्हणाले.

दरम्यान रोहित आणि विराट हे दोघे लवकरच वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त होऊ शकतात, ज्यामुळे 2027 च्या विश्वचषकात खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगेल, अशाही बातम्या आहेत.

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे वन-डे क्रिकेटमधील महान खेळाडू आहेत.   विराटने 302 सामन्यांच्या 290 इनिंगमध्ये 57.88 च्या सरासरीने 14,181 रन्य केल्या आहेत, ज्यात 51 सेंच्युरी आणि 74 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 183 आहे.

दुसरीकडे, रोहितने 272 सामन्यांमधील 265 इनिंगमध्ये 48.76 च्या सरासरीने 11,168 रन्स केले आहेत. ज्यात 32 सेंच्युरी आणि 59 हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. त्याचा सर्वोत्तम स्कोअर 264 आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com