India vs Pakistan WCL 2025 : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर 'वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स' (WCL) मधील पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्धचा पहिला सामना इंडिया चॅम्पियन्सने सोडून दिला. सेमी फायनलमध्ये, इंडिया चॅम्पियन्सने पुन्हा एकदा सामन्यातून माघार घेतली, ज्यामुळे पाकिस्तान चॅम्पियन्सला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळाला. फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सशी झाला, पण त्यात त्यांचा पराभव झाला. या स्पर्धेत सहभागी असलेल्या आणि बहिष्काराच्या निर्णयात आघाडीवर असलेल्या एका भारतीय दिग्गजाने आता NDTV ला नाव न छापण्याच्या अटीवर, या माघारीबाबत एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केला आहे.
"शाहिद आफ्रिदीने केलेल्या आणि तो अजूनही करत असलेल्या वक्तव्यांमुळे त्याच्याविरुद्ध न खेळण्याचा हा निर्णय भारतीय संघानं घेतला, ' अशी महत्त्वाची माहिती या खेळाडून NDTV शी बोलताना दिली.
मग शाहिद आफ्रिदी पाकिस्तान चॅम्पियन्स संघाचा भाग नसता तर हा निर्णय बदलला असता का? "हा नंतरचा विचार आहे. आम्हाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याची माहिती होती, पण टीमममधील खेळाडूंच्या निवडीबद्दल खात्री नव्हती," असे त्या दिग्गजाने NDTV ला सांगितले.
"आम्ही येथे क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत, आणि मी नेहमीच म्हटले आहे की क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. ते पुढे गेले पाहिजे. खेळाडू हा त्याच्या देशासाठी चांगला प्रतिनिधी असावा, अपमानाचे कारण नाही," असे आफ्रिदी म्हणाला होता.
( नक्की वाचा : Shahid Afridi : लाज गेली! मैदान सोडून गेली भारतीय टीम, फक्त बघत बसला आफ्रिदी, पाहा Video )
इंडिया चॅम्पियन्स संघात शिखर धवन, सुरेश रैना, इरफान पठाण आणि युसूफ पठाण सारखे खेळाडू आहेत, ज्यांनी पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध खेळण्यास नकार दिला.
भारताने लीजेंड्स लीगवर बहिष्कार टाकल्यानंतर, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) ने WCL मध्ये देशाच्या सहभागावर बंदी जाहीर केली. WCL ने भारत-पाकिस्तान सामन्यांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेवर, 'ढोंगीपणा आणि पक्षपाताचा' आरोप करत, PCB ने या निर्णयाचे समर्थन केले आहे.