Fraud News : 25 लाखांची फसवणूक, मग घरात चोरी, भारताच्या स्फोटक क्रिकेटपटूची संघ सहकाऱ्याविरोधात तक्रार

दिप्तीचे आग्र्यातील राजेश्वर मंदिराजवळ एक फ्लॅट आहे. या फ्लॅटवर आरूषीचं येणं-जाणं होतं. पैसे परत करण्यावरून झालेल्या वादावादीनंतर दिप्तीने आरूषीला फ्लॅटवर येण्यास मनाई केली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Crime News : भारतीय महिला क्रिकेट टीमची सदस्य असलेल्या आणि स्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध मिळवलेल्या दिप्ती शर्माच्या घरी चोरी झाली आहे. इतकंच नाही तर तिला 25 लाखांचा गंडा देखील घालण्यात आला आहे. यासंदर्भात तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दिप्ती ही पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. धक्कादायक बाब ही आहे की तिची सहकारी आरूषी गोएल ही या सगळ्यामागे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिप्ती शर्माने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तिच्या आग्रा येथील फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे. सोन्या चांदीचे दागिने, 2 लाखांची परकीय चलन आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या आहेत. दिप्तीच्या तक्रारीत यामागे आरूषी गोएल हिच्यावर संशय असल्याचे म्हटले आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आरूषी गोएलला याबाबत विचारले असता तिने याबद्दल बोलण्यास नकार दिला. आरूषी(27 वर्षे) ही उत्तर प्रदेश महिला क्रिकेट संघाचा भाग आहे. ती भारतीय रेल्वेच्या आग्रा विभागाच्या ज्युनिअर क्लर्क म्हणून काम करते आहे. सध्या सुरू असलेल्या वुमन्स प्रिमिअर लीगच्या युपी वॉरिअर्झ संघाची दिप्ती शर्मा ही कर्णधार असून आरूषी ही तिच्या संघाचा भाग आहे. 

Advertisement

दिप्ती आणि आरूषी या दोघीही एकमेकांना चांगल्या ओळखतात. या दोघी उत्तर प्रदेशच्या संघातून खेळलेल्या आहेत. आरूषी आणि तिच्या आईवडिलांनी दिप्तीशी जवळीक वाढवली आणि तिने आर्थिक संकटाचे आणि पैशांची गरज असल्याचे कारण देत आपल्याकडून वेळोवेळी पैसा घेतल्याचे दिप्तीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आरूषी आणि तिच्या आईवडिलांनी आपल्याकडून आतापर्यंत 25 लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पैसे परत मागितले असता सुरूवातीला टाळाटाळ करण्यात आली आणि नंतर तिच्यासोबत गैरवर्तव करण्यात आले असाही आरोप करण्यात आला आहे. 

Advertisement

(नक्की वाचा- Badlapur News: बदलापूरकरांना मोठा दिलासा! पुढील 30 वर्षांचा पाणीप्रश्न मिटणार)

दिप्तीचे आग्र्यातील राजेश्वर मंदिराजवळ एक फ्लॅट आहे. या फ्लॅटवर आरूषीचं येणं-जाणं होतं. पैसे परत करण्यावरून झालेल्या वादावादीनंतर दिप्तीने आरूषीला फ्लॅटवर येण्यास मनाई केली होती. मात्र तरीही आरूषी 22 एप्रिलला चोरून आपल्या घरात घुसली असा दिप्तीने आरोप केला आहे. तिने आपल्या घरातील दागदागिन्यांसह अनेक मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचा आरोप दिप्तीने केला आहे. जाता जाता आरूषीने या फ्लॅटचं लॉक बदललं होतं. 

Advertisement

(नक्की वाचा- बायकोसोबत जबरदस्तीने संबंध, बेडरुमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले... निलेश चव्हाणचे कारनामे)

23 एप्रिल रोजी आरूषीने दिप्तीशी संपर्क साधून फ्लॅटमध्ये असलेलं सामान घेऊन जायचं आहे असं सांगितलं होतं. हे सामान खरंतर तिने आदल्या दिवशीच नेलं होतं. दिप्तीने आरूषीसोबत तिच्या भावाला पाठवलं होतं. तेव्हा कळालं की फ्लॅटचं कुलूप बदलण्यात आलं आहे. यानंतर दिप्तीने आरूषी आणि तिच्या आईवडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

Topics mentioned in this article