IND vs ENG: लॉर्ड्स टेस्टमध्ये अटीतटीच्या लढतीत झालेल्या पराभावतून सावरण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडियाचा 22 रन्सनं पराभव झाला. या पराभवानं भारतीय टीम पाच टेस्टच्या सीरिजमध्ये 1-2 अशी पिछाडीवर पडली आहे. तिसरी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला विजयासाठी 193 रन्सची आवश्यकता होती. पण, अचानक भारतीय इनिंग कोसळली. रविंद्र जडेजा, जसप्रीत मराह आणि मोहम्मद सिराज यांनी जोरदार झुंज दिली, परंतु भारतीय टीम 170 रन्सवर ऑल आऊट झाली. त्यांनी 22 रन्सनं टेस्ट मॅच गमावली.
आता ही सीरिज जिंकण्यासाठी भारताला इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या दोन्ही टेस्ट जिंकणे आवश्यक आहे. चौथ्या टेस्टच्या तयारी करत असलेल्या टीम इंडियाला धक्का बसलाय. कारण, फास्ट बॉलर अर्शदीप सिंगला नेटमध्ये सराव करताना हाताला दुखापत झाली आहे.
अर्शदीपने अद्याप टीम इंडियाकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही, परंतु तो चौथ्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये असण्याची दाट शक्यता होती.
( नक्की वाचा : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीमागे कुणाचा हात? BCCI उपाध्यक्षांनी सांगितलं सर्व सत्य )
भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशे (Ryan ten Doeschate) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अर्शदीपला सरावादरम्यान बॉल लागला आणि त्याला त्वरित डॉक्टरांकडे नेण्यात आले.
ते म्हणाले, "तो तिथे बॉलिंग करत असताना त्याला बॉल लागला. त्याने तो थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या हाताला दुखापत झाली. ही दुखापत किती गंभीर आहे, हे पाहावे लागेल. वैद्यकीय पथकाने त्याला डॉक्टरांकडे नेले आहे. त्याला दुखापतीनंतर टाके लागतील की नाही, हे पुढील काही दिवसांच्या आमच्या नियोजनासाठी महत्त्वाचे ठरेल."
( नक्की वाचा : ENG vs IND : 'आयसीसीने याकडे लक्ष देण्याची गरज', लॉर्ड्स टेस्टमधील अंपायरवर अश्विन संतापला )
दरम्यान टीम इंडियाचा प्रमुख बॉलर जसप्रीत बुमराहचा चौथ्या टेस्टमधील सहभाग अद्याप निश्चित नाही. बुमराहनं लॉर्ड्स टेस्टमध्ये 7 विकेट्स घेतल्या होत्या. पण, तो या सीरिजमध्ये पाचपैकी तीन टेस्ट खेळणार असल्याचे यापूर्वीच ठरले आहे.
बुमराह, जो पूर्वनियोजित योजनेंतर्गत मालिकेत जास्तीत जास्त तीन कसोटी खेळणार होता, त्याने लॉर्ड्समध्ये सात विकेट घेऊन संघाचे नेतृत्व केले, परंतु पुढील सामन्यासाठी त्याची उपलब्धता अद्याप निश्चित झालेली नाही.