India Squad for Test Series vs south Africa: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या संघात स्टार विकेटकीपर-बॅटर ऋषभ पंत याचे उपकर्णधार म्हणून पुनरागमन झाले आहे. दुसरीकडे, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि विकेटकीपर-बॅटर एन जगदीशन यांना संघात स्थान मिळवता आलेले नाही, तर अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी यालाही पुन्हा संधी देण्यात आलेली नाही.
पंतचे पुनरागमन
ऋषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजच्या दरम्यान दुखापत झाली होती, ज्यामुळे तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत खेळू शकला नव्हता. मात्र, आता तो पूर्णपणे बरा झाला आहे. निवड समितीने त्याच्या फिटनेस आणि फॉर्मची चाचणी घेण्यासाठी त्याला दक्षिण आफ्रिका 'ए' विरुद्धच्या दोन 4-दिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली होती. या चाचणीत पंत यशस्वी ठरला आहे. त्याने पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये 90 रनची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
एन. जगदीशनच्या जागी पंतला संघात घेण्यात आले असून, प्रसिध कृष्णाच्या जागी वेगवान गोलंदाज आकाश दीप याची निवड करण्यात आली आहे. उर्वरित टीम वेस्ट इंडिजविरुद्ध निवडलेल्या संघाप्रमाणेच आहे.
( नक्की वाचा : EXCLUSIVE: 'खाण्यासाठी पैसे नव्हते', वर्ल्ड चॅम्पियन Kranti Goud ने NDTV ला सांगितली संघर्षाची कहाणी, पाहा VIDEIO)
दौरा आणि महत्त्वाच्या तारखा
दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर ऑल-फॉर्मेट मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होईल.
पहिली टेस्ट: 14 नोव्हेंबरपासून, कोलकाता
दुसरी टेस्ट: 22 नोव्हेंबरपासून, गुवाहाटी
न्यूज एजन्सी IANS नुसार, अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील पुरुष निवड समितीने बुधवारी (5 नोव्हेंबर 2025) ऑनलाइन बैठकीत संघावर शिक्कामोर्तब केले. दक्षिण आफ्रिका 'ए' विरुद्धची दुसरी कसोटी 8 नोव्हेंबरपासून खेळली जाईल, ज्यात शुभमन गिल, जसप्रीत बुमरा, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांच्यासह अनेक कसोटी खेळाडू खेळण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची भारताची टेस्ट टीम
कॅप्टन: शुभमन गिल
व्हाईस/विकेटकीपर: ऋषभ पंत
बॅटर: यशस्वी जयसवाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल
विकेटकीपर-बॅटर: ध्रुव जुरेल
ऑल-राऊंडर: रवींद्र जडेला, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी
बॉलर: जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप