India Tour of England : आयपीएल 2025 नंतर टीम इंडिया इंग्लंडला जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये पाच टेस्टची सीरिज खेळली जाणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोन दिग्गज खेळाडूंच्या निवृत्तीनंतरची भारताची ही पहिलीच टेस्ट सीरिज आहे. त्यामुळे या दौऱ्यात कुणाची निवड होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
पाच टेस्टच्या या सीरिजसाठी टीम इंडियाच्या नव्या कॅप्टनचं नाव 23 किंवा 24 तारखेला पत्रकार परिषदेत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर या सीरिजमध्ये कोणत्या खेळाडूंना जागा मिळेल याची माहिती सूत्रांनी दिलीय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कशी असेल टीम इंडिया
1. शुभमन गिल (कॅप्टन) 2. अभिमन्यू इश्वरन 3. यशस्वी जयस्वाल 4. साई सुदर्शन 5. केएल राहुल 6. श्रेयस अय्यर 7. ऋषभ पंत 8. रवींद्र जडेजा 9. नितीश कुमार रेड्डी 10. करुण नायर/सरफराज खान 11. मोहम्मद सिराज 12. मोहम्मद शमी 13. हर्षित राणा/अर्शदीप सिंह 14. प्रसिद्ध कृष्णा 14. जसप्रीत बुमराह 15. कुलदीप यादव 17. ध्रुव जुरेल
( नक्की वाचा : Prithvi Shaw : IPL मध्ये पुन्हा मिळाला नाही भाव, पृथ्वी शॉचा रहस्यमयी पोस्टमधून काय इशारा? )
राखीव खेळाडू कोण?
हा दौरा बराच मोठा आहे. काही सिनियर खेळाडूंचा फिटनेस आणि दुखापतींचा इतिहास लक्षात घेता टीम इंडियात काही राखीव फास्ट बॉलर असू शकतात. त्यासाठी आकाश दीप, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मुकेस कुमार यांची नावे चर्चेत आहेत. फास्ट बॉलर्स ताजे राहावेत यासाठी बीसीसीआय काही राखीव बॉलर्सची कुमक इंग्लंडला पाठवू शकते.
त्याचबरोबर आणखी काही खेळाडू देखील राखीव म्हणून जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये राखीव विकेट किपर म्हणून इशान किशनच्या नावाची सर्वाधिक चर्चा आहे. अन्य खेळाडूंमध्ये वॉशिंग्टन सुंदर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अश्विनच्या निवृत्तीनंतर पाठवण्यात आलेला तनुष कोटियान आणि उत्तर प्रदेशचा विकेट किपर आर्यन जुयालच्या नावाची चर्चा आहे.