
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्या क्रिकेट कारकिर्दीमधील सध्या खराब कालखंड सुरु आहे. पृथ्वी डिसेंबर महिन्यात सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला आहे. त्यानंतर झालेल्या आयपीएल ऑक्शनमध्ये त्याला कोणत्याही फ्रँचायझीनं खरेदी केलं नाही. इतकच नाही तर जखमी खेळाडूंच्या बदली त्याला करारबद्ध करण्यासही कुणी उत्सुकता दाखवलेली नाही.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आयपीएल 2025 चा सिझन पुन्हा एकदा 17 मे पासून सुरु होत आहे. पृथ्वीनं त्यापूर्वी एक रहस्यमयी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केलीय. या पोस्टची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पृथ्वीच्या मनात नेमकं काय सुरु आहे? हा प्रश्न या पोस्टमधून विचारला जात आहे.
पृथ्वी शॉनं 'मला ब्रेक हवाय' अशी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली. या पोस्टमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शॉ सध्या अवघड कालखंडातून जात आहे का? तो त्याच्या करियरमध्ये काही बदल करणार आहे का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
Prithvi Shaw Instagram Story #IPL2025 pic.twitter.com/jrOwH2Tx0h
— Raja (@_raja_kumar) May 14, 2025
पृथ्वी शॉ ला एकेकाळी भारतीय क्रिकेटचं भविष्य मानले जात असे. पण, खराब फॉर्म आणि फिटनेसच्या प्रश्नामुळे त्याच्या कारकिर्दीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024 च्या दरम्यान पृथ्वी फिटनेसच्या समस्येमुळेच मुंबई टीममधून वगळण्यात आले होते. टीममधून वगळण्यापूर्वी त्याचा फॉर्मही साधारण होता. आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये पृथ्वी शॉनं त्याची बेस प्राईज 75 लाख निश्चित केली होती. त्यानंतरही त्याला कोणत्याही फ्रँचायझीनं खरेदी केलं नाही.
( नक्की वाचा : India Tour of England : शुबमन गिल नाही तर 'या' खेळाडूला टीम इंडियाचा कॅप्टन करा, गावस्करांचा सल्ला )
पृथ्वी शॉ चा जुना सहकारी आणि पंजाब किंग्जचा प्रमुख खेळाडू शशांक सिंहनं (Shashank Singh) काही दिवसांपूर्वी एका पॉडकास्टमध्ये पृथ्वीबद्दल मोकळेपणे मत व्यक्त केले होते. 'मी पृथ्वीला वयाच्या 13 व्या वर्षापासून ओळखतो. त्याला कमी लेखण्यात आलं आहे. त्यानं पुन्हा बेसिक गोष्टींवर लक्ष दिलं तर तो काहीही करु शकतो, असं शशांकनं सांगितलं होतं.
शशांकनं या पॉडकास्टमध्ये सांगितलं की, 'पृथ्वीला कदाचित 11 ऐवजी रात्री 10 वाजता झोपायला पाहिजे. त्यानं त्याच्या डाएटमध्ये सुधारणा करावी. त्यानं या गोष्टीचं अनुकरण केलं आणि तो बदलला तर भारतीय क्रिकेटसाठी ती खूप चांगली गोष्ट असेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world