Virat Kohli Fined for Hitting Sam Constance IND vs AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील बॉक्सिंग डे (Boxing Day Test) टेस्टला सुुरुवात झाली आहे. मेलबर्नच्या MCG मैदानावर सुरु असलेल्या मॅचमधील पहिला दिवस वादामुळे गाजला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या टेस्टमध्ये पदार्पण करणारा ऑस्ट्रेलियन ओपनर सॅम कोन्टास (Sam Konstas ) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) वाद झाला. या प्रकरणात विराटवर कारवाई करण्यात आलीय. 'क्रिकबझ'मनं दिलेल्या वृत्तानुसार या वादावादीनंतर विराटच्या मॅच फिसमधील 20 टक्के रक्कम कापण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याला एक डिमेरिट पॉईंट मिळालाय.
नेमकं काय घडलं?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी हा प्रकार घडला. या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियचा कॅप्टन पॅट कमिनन्सनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. पदार्पण करणारा सॅम कोन्टास आणि अनुभवी उस्मान ख्वाज यांनी ऑस्ट्रेलियाला दमदार सुरुवात करुन दिली. या दोघांमध्ये कोन्टास चांगलाच आक्रमक होता. त्यानं चक्क बुमराहला सिक्सरही लगावला.