IND vs ENG : कॅप्टन सूर्या इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर, कुणालाही जमलं नाही ते करणार?

Suryakumar Yadav, India vs England T20 : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी20 सीरिजचा पहिला सामना आज (बुधवार, 22 जानेवारी) कोलकातामध्ये होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Suryakumar Yadav, India vs England T20 : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी20 सीरिजचा पहिला सामना आज (बुधवार, 22 जानेवारी) कोलकातामध्ये होणार आहे. या मॅचमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव इतिहासाच्या उंबठ्यावर आहे. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये आजवर कुणालाही जमलं नाही ते सूर्या या सीरिजमध्ये करु शकतो. सूर्या पहिल्याच प्रयत्नात कोलकातामध्ये ही संधी साधणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागंलंय. 

कोणता रेकॉर्ड करणार?

सूर्यकुमार यादव इंग्लंड विरुद्धच्या सीरिजमध्ये आणखी एक सेंच्युरी झळकवण्यास यशस्वी झाला तर तो टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध दोन सेंच्युरी करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरेल. टीम इंडियाच्या कॅप्टननं टी20 इंटरनॅशनलमध्ये 4 सेंच्युरी झळकावल्या आहेत. त्यानं आत्तापर्यंत इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध प्रत्येकी एक सेंच्युरी झळकावलीय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

त्याचबरोबर सूर्या टी20 इंटरनॅशनलमध्ये 150 सिक्स लगावण्यापासून फक्त 5 सिक्स दूर आहे. त्यानं हा रेकॉर्ड केला तर T20I मध्ये 150 पेक्षा जास्त सिक्स लगावणारा दुसरा भारतीय बनेल. या यादीमध्ये रोहित शर्मा 205 सिक्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. सूर्यानं 150 सिक्सचा टप्पा ओलांडला तर हा विक्रम करणारा तो क्रिकेट विश्वातील चौथा आणि भारताचा दुसरा बॅटर बनेल. 

अर्शदीपलाही संधी

टीम इंडियाचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंग T20I मध्ये शंभर विकेट्स घेण्यापासून फक्त 5 विकेट्स दूर आहे. T20I मध्ये 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणारा पहिला भारतीय होण्याची संधी सूर्याला या सीरिजमध्ये आहे. तर वॉशिंग्टन सुंदर T20I मध्ये 50 विकेट्सपासून 3 विकेट्स दूर आहे. 

Advertisement

( नक्की वाचा : IND vs ENG: पहिल्या T20 साठी इंग्लंडनं जाहीर केली Playing 11, अनुभवी खेळाडूचं पुनरागमन )
 

भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सीरिजचं वेळापत्रक 

पहिली T20 - 22 जानेवारी (कोलकाता)
दुसरी T20 - 25 जानेवारी (चेन्नई)
तिसरी T20 - 28 जानेवारी (राजकोट)
चौथी T20 - 31 जानेवारी (पुणे)
पाचवी T20 - 2 फेब्रुवारी (मुंबई)

पहिली वनडे - 6 फेब्रुवारी (नागपूर)
दुसरी वनडे - 9 फेब्रुवारी (कटक)
तिसरी वनडे - 12 फेब्रुवारी (अहमदाबाद)
 

Topics mentioned in this article