जाहिरात

IND vs ENG: पहिल्या T20 साठी इंग्लंडनं जाहीर केली Playing 11, अनुभवी खेळाडूचं पुनरागमन

England Announced Playing 11 For First T20I: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची T20 सीरिज बुधवारी सुरु होत आहे

IND vs ENG: पहिल्या T20 साठी इंग्लंडनं जाहीर केली Playing 11, अनुभवी खेळाडूचं पुनरागमन
मुंबई:

England Announced Playing 11 For First T20I: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची T20 सीरिज बुधवारी सुरु होत आहे. या सीरिजमधील पहिला सामना सुरु होण्याच्या 24 तास आधीच इंग्लंडनं त्यांती प्लेईंग 11 जाहीर केली आहे. आक्रमक बॅटर जोस बटलर टीमचं नेतृत्त्व करणार आहे. तर विकेटकिपिंगची जबाबदारी फिल सॉल्टच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

व्हाईस कॅप्टन कोण?

इंग्लंडचा तरुण क्रिकेटपटू हॅरी ब्रूकला या सीरिजसाठी टीमचा व्हाईस कॅप्टन करण्यात आलं आहे. 25 वर्षांच्या ब्रूकने गेल्या काही दिवसांमध्ये टीमसाठी जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्याला या सीरिजमध्ये प्रमोशन देण्यात आलं आहे. 

ब्रूकनं इंग्लंडकडून आत्तापर्यंत 39 T20 सामने खेळले आहेत. त्यामधील 33 इनिंगमध्ये त्यानं एकूण 30.74 च्या सरासरीनं 707 रन काढले आहेत. त्यामध्ये तीन हाफ सेंच्युरींचा समावेश आहे. 

अनुभवी बॉलरचं पुनरागमन

गेल्या काही महिन्यांपासून इंग्लंड टीममधून बाहेर असलेला फास्ट बॉलर मार्क वुडचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. तो यापूर्वी इंग्लंडकडून जून 2024 मध्ये झालेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळला होता. त्यानंतर तो दुखापतीमुळे टीमच्या बाहेर होता. आता वूड पूर्णपणे फिट आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याचा फिटनेस तपासण्यासाठी इंग्लंडनं त्याचा टीममध्ये समावेश केला आहे.

Wankhede Stadium  'तुम्ही घाटी लोक...' मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं मुंबईचं वानखेडे स्टेडियम

( नक्की वाचा : Wankhede Stadium 'तुम्ही घाटी लोक...' मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं मुंबईचं वानखेडे स्टेडियम )

कोण करणार ओपनिंग?

भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी20 मध्ये फिल सॉल्ट आणि बेन डकेट इंग्लंडच्या इनिंगची सुरुवात करतील. हेड कोच ब्रँडन मॅकलमनं यापूर्वीच ही घोषणा केली आहे. कॅप्टन जोस बटलर तिसऱ्या क्रमांकावर खेळणार आहे. 

बटरलनं 129 टी सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामधील 118 इनिंमध्ये 35.67 च्या सरासरीनं त्यानं 3389 रन काढले आहेत. बटरनं टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सेंच्युरी आणि 25 हाफ सेंच्युरी झळकावल्या आहेत. 

पहिल्या T20 साठी इंग्लंडची Playing 11

बेन डकेट, फिल सॉल्ट (विकेट किपर), जोस बटलर (कॅप्टन), हॅरी ब्रूक (व्हाईस कॅप्टन), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड.


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com